नाशिक

फागणे साडेतीन लाखाची मदत

CD
KPD26B13293 धुळे : मुख्यमंत्री सहायता निधी मंजूरीचे पत्र पवार यांना देतांना सरपंच ज्ञानज्योती भदाणे. -- यकृत प्रत्यारोपणासाठी साडेतीन लाखांची मदत - फागणेच्या भटू पवारांना मुख्यमंत्री सहायता निधीतून दिलासा सकाळ वृत्तसेवा कापडणे, ता. ५ : फागणे (ता. धुळे) येथील भटू प्रकाश पवार यांच्या यकृत प्रत्यारोपणाच्या उपचारासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून तीन लाख ५० हजार रुपयांची भरीव आर्थिक मदत मंजूर झाली आहे. आमदार राम भदाणे यांच्या पाठपुराव्यामुळे ही मदत मिळाली असून, मदत मंजुरीचे पत्र माजी सभापती तथा सरपंच ज्ञानज्योती भदाणे यांच्या हस्ते कुटुंबियांना देण्यात आले. - भटू पवार यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे यकृत प्रत्यारोपणाचा खर्च करणे त्यांना शक्य नव्हते. त्यांनी याबाबत आमदार भदाणे यांना माहिती दिली. आमदार भदाणे यांनी तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून विशेष प्रयत्न केले. या प्रयत्नांना यश मिळून मुख्यमंत्री सहायता निधीतून साडेतीन लाख रुपये मंजूर झाले जी रक्कम नवी मुंबईस्थित अपोलो हॉस्पिटल यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली. या आर्थिक मदतीमुळे भटू पवार यांच्या जगण्याच्या दुर्दम्य इच्छाशक्तीला बळ मिळाले आहे. या मदतीबद्दल पवार कुटुंबाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार राम भदाणे, मुख्यमंत्री सचिवालयाचे कक्षप्रमुख रामेश्वर नाईक, राज्याचे वैद्यकीय समन्वयक डॉ. स्वानंद सोनार, राज्य समन्वयक डॉ. रितेश पाटील, जिल्हा समन्वयक डॉ. मनोज विसपुते यांचे आभार व्यक्त केले. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश पाटील, कमलेश भोई, कपिल पिवाल आणि मुख्यमंत्री सहायता निधीसाठी आमदार प्रतिनिधी वीरपाल गिरासे यांनी मंजुरीसाठी सहकार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dahi Handi Accident Mumbai : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; ७ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, दोरी बांधलेला विटांचा कॉलम कोसळला

ऑनलाइन Grocery खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, काय बदलणार?

DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांना जन्माष्टमीची भेट! महागाई भत्त्यात ६० टक्के वाढ, सरकार मोठा निर्णय घेणार

Marathi News Live Updates: पंतप्रधानांचा फोटो काढल्याप्रकरणी मनसेचे आशिष साबळे प्रशांत कनोजिया, विक्रांत कनोजियांना जामीन मंजूर

झीरम घाटी नक्षलवादी हल्ला प्रकरणात NIA कोर्टाने १० आरोपींना ठरवलं दोषी; छत्तीसगड काँग्रेसच्या सर्व बड्या नेत्यांचं हत्याकांड प्रकरण

SCROLL FOR NEXT