KPD26B13318
धुळे : अतिरीक्त जिल्हाधिकारी संदीप पाटील यांना निवेदन देतांना पदाधिकारी.
---------
खासगी शिकवणी केंद्रासाठीच्या जाचक अटी रद्द करा
‘पीटीए’च्या शिक्षकांचे धरणे आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
कापडणे, ता. ९ : राज्य शासनाने खासगी शिकवणी केंद्रांच्या नोंदणी व नियमनासाठी प्रस्तावित केलेल्या खासगी शिकवणी केंद्र अधिनियम मसुदा २०२६ मधील जाचक अटी रद्द करून संबंधित घटकांशी चर्चा केल्यानंतरच अंतिम निर्णय घ्यावा, या मागणीसाठी खासगी कोचिंग क्लासेसचे संचालक, शिक्षक, शिक्षिका आदींनी मंगळवारी (ता. ८) क्युमाईन क्लबजवळ धरणे आंदोलन केले. आंदोलनानंतर अतिरीक्त जिल्हाधिकारी संदीप पाटील यांना निवेदन दिले.
प्रायव्हेट टीचर असोसिएशनच्या (पीटीए) निवेदनात म्हटले आहे की, राज्य सरकार कोचींग क्लासेसच्या संदर्भात विधेयक आणणार आहे. तयार केलेल्या मसुद्याचे पुढे कायद्यात रूपांतर होणार असून, प्रस्तावित नियमामुळे स्वयंरोजगाराच्या माध्यमातून खासगी शिकवणी वर्ग चालविणाऱ्या लाखो संचालक, शिक्षक आणि सुशिक्षित बेरोजगारांच्या सेवा व्यवसायावर परिणाम होण्याची भीती आहे.
सध्याच्या वाढत्या शैक्षणिक स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी खासगी शिकवणी वर्ग हा पालकांसाठी महत्त्वाचा आधार बनला आहे. शालेय शिक्षणाबरोबर शिकवणी वर्गाची आवश्यकता आहे. प्रस्तावित कायद्यातील कठोर अटी, आर्थिक बोजा, दंडात्मक तरतुदी, वारंवार होणाऱ्या तपासण्या आणि वाढते प्रशासकीय नियंत्रण यामुळे हजारो छोटे शिकवणी वर्ग बंद पडतील. देश व राज्य पातळीवर वाढलेल्या शैक्षणिक स्पर्धेमुळे विद्यार्थी जेईई, नीट आणि सीईटीसारख्या स्पर्धात्मक परीक्षांची तयारी खासगी कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून करतात. प्रस्तावित कायद्यातील जाचक अटींमुळे अशा परीक्षांच्या तयारीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. शासनाने विद्यार्थ्यांचे हित आणि स्वयंरोजगार निर्माण करणाऱ्या शिक्षक व संचालकांचे हित या दोन्ही बाजींचा विचार करून प्रस्तावित कायद्यातील जाचक अटी कमी कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.
या वेळी पीटीएचे जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. संजय कदम, संघटक गिरीश साळुंके, जिल्हा उपाध्यक्ष जगन्नाथ पाटील, जिल्हा उपाध्यक्ष विजय जाधव, अभिजित सनेर, उमेश जाधव, दीपक सोनवणे, नरेंद्र महाले, ललित पाटील, योगेश साळुंखे, अनिल वाडीले, उमेश भांडारकर, संजय महाजन, अविनाश सोनवणे, संदीप बडगुजर, कन्हैयालाल सोनी, हितेश आव्हाड, चंद्रशेखर पवार, शशिकांत देवरे, विश्वजीत अहिरराव, गजानन चौधरी, चंद्रकांत शिंपी, मैत्रेयी पाटील, दीपश्री पाचपुते, स्वाती पाटील, बनवारीलाल शर्मा, प्रमोद चौधरी, यश कोटेचा, दिनेश जोशी, राहुल बोरसे, निलेश मोरे, सचिन वाघ आदी आंदोलनात सहभागी झाले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.