नाशिक

धुळे पाऊसअभावी पिके करपलीत

CD
(पान ४ ला सेकंड मेन) KPD26B13365, KPD26B13366 देवभाने : शिवारात पावसाअभावी करपलेले मका पीक. दुसऱ्या छायाचित्रात धमाणे शिवारात वाढ खुंटलेले कपाशीचे पीक. ----------- धुळे तालुक्यात पावसाअभावी पिके होरपळली आता पाऊस पडून हाती काय लागणार; शेतकऱ्यांचा प्रश्न सकाळ वृत्तसेवा कापडणे, ता. १९ : धुळे तालुक्यात ३१ जुलैला झालेल्या अतिवृष्टीनंतर तब्बल दीड महिन्यांपासून पावसाने दडी मारली आहे. परिणामी, तालुक्यातील खरीप हंगामातील पिके होरपळून गेली असून, आता पाऊस पडूनही हाती काही लागणार नाही, अशी व्यथा शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. धुळे तालुक्यात यंदा पेरणी तीन आठवडे उशिरा झाली होती. मात्र, जुलैअखेरच्या पावसानंतर पावसाचा खंड पडला. गेल्या ४५ दिवसांपासून पाऊस बेपत्ता असल्याने शेतातील ओलावा संपला आहे. बाजरी, ज्वारी, मका, कपाशी या मुख्य पिकांची वाढ खुंटली असून, पाने पिवळी पडून पिके करपत आहेत. कापसाची बोंडे धरलीच नाहीत, तर बाजरी, ज्वारी व मक्याची कणसे भरली नाहीत. सर्वात मोठा फटका कडधान्य पिकांना बसला आहे. मूग, उडीद, मठ व चवळी यांचे उत्पादन नसल्यात जमा झाले आहे. ही पिके वखरली गेली आहेत. ज्या शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली, त्यांचा खर्चही वाया गेला आहे. मशागत, बियाणे, खते, फवारणी यासाठी हजारो रुपये खर्च करूनही पीक हाती न आल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. कापडणे, सोनगीर, नगाव, वलवाडी, बोरकुंड, लामकानी, नेर, कुंडाणे, मोराणे, मुकटी, आर्वी, लामकानी, कुसूंबा, सडगाव परिसरात परिस्थिती अधिक गंभीर आहे. विहिरींची पाणीपातळी खालावल्याने पिकांना पाणी देणेही शक्य नाही. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. करपलेल्या पिके जनावरांचे वैरण झाले आहे. दरम्यान, शासनाने तातडीने पंचनामे करून धुळे तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, पीकविमा आणि चारा छावण्यांची मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुख्यमंत्र्यांना दारू, अंडी-टोमॅटो देण्याचा प्रयत्न, भाजप नेत्याला घेतलं पोलिसांनी ताब्यात

Nanded Cashew Almond Video : नांदेडच्या बैठकीतील काजू-बदामाचा व्हिडीओ व्हायरल; हिंगोलीत शेतकऱ्यांनी कृषिमंत्र्यांसमोर बशी ठेवत केला निषेध

Hyundai Bayon SUV: ऑटो बाजारात Hyundai चा धमाका; नव्या 'बेयॉन' SUV च्या लूक अन् डिझाइनचे पहिले स्केच आउट!

Raj Thackeray UPI : युपीआयवरील MDR म्हणजे ‘डिजिटल सापळा’; राज ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्लाबोल, व्यापाऱ्यांना शुल्क न भरण्याचं आवाहन

Latest Marathi News Update : मालकाच्या मुलीचा WhatsApp DP पाहिला अन् 3.70 कोटी पाठवले

SCROLL FOR NEXT