नाशिक

दहावी निकाल सुधारित बातमी

CD
KSE26B01779 पेरेजपूर : विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन सन्मान करताना न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयाचे शिक्षक व पालक. -------- गुणवंत विद्यार्थ्यांचा घरी जाऊन सन्मान पेरेजपूर येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या शिक्षकांचा उपक्रम सकाळ वृत्तसेवा कासारे, ता. १४ : साक्री तालुक्यातील पेरेजपूर येथील श्री शिवमहाराष्ट्र प्रतिष्ठान संचलित न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयाचा एसएससी परीक्षेचा निकाल उल्लेखनीय लागला असून, गुणवंत विद्यार्थ्यांचा शालेय प्रशासनाने त्यांच्या घरी जाऊन सन्मान केला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गावातच दर्जेदार शिक्षण मिळावे, या उद्देशाने विद्यालयाची स्थापना करण्यात आली आहे. विद्यालयातील बहुतांश विद्यार्थी शेतकरी व शेतमजूर कुटुंबातील असून, प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत त्यांनी घवघवीत यश संपादन केले. यंदाच्या निकालात प्राची देवरे व प्रणाली शेवाळे यांनी प्रत्येकी ९१.४० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. ऋतिका ठाकरे हिने ८८.६० टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळविला, तर सलोनी खैरनार हिने तृतीय क्रमांक मिळवून यश संपादन केले. तसेच, वैष्णवी शेवाळे (८२.६० टक्के), सप्तश्री गायकवाड (८१.८० टक्के), आयुष सोनवणे (८१.२० टक्के) यांनीही उल्लेखनीय यश मिळविले. दक्षता गायकवाड व मेघा सोनवणे यांच्यासह सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा त्यांच्या घरी जाऊन सत्कार करण्यात आला. या वेळी तज्ज्ञ मार्गदर्शक तानाजीराव शेवाळे, पंडितराव शेवाळे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र देवरे, मुख्याध्यापक बाळकृष्ण तोरवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वर्गशिक्षक व्ही. डी. देसले, श्रीमती एस. एस. देवरे, गौरव सोनवणे, पंकज बोरसे, विकास बोरसे, संजय देसले व चंद्रकांत बोरसे यांनी विद्यार्थ्यांचा गौरव केला. संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य बी. एस. पाटील, उपाध्यक्ष दिनकरराव पाटील, सचिव ॲड. एस. जे. भामरे, शालेय समिती अध्यक्षा श्रीमती प्रमिलाबाई देसले, संचालक डॉ. पी. डी. देवरे, डॉ. अमित पाटील, शशीभूषण देसले यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT