सुविधा देणे हेच
खरे समाजकारण : झिरवाळ
लखमापूर, ता. २३ : समाजात जेवढे महत्त्व धार्मिक मंदिरांना आहे, तितकेच अनन्यसाधारण महत्त्व ज्ञानमंदिरांना म्हणजेच शाळांना आहे. शाळांमध्ये आधुनिक सुविधा मिळवून देणे हेच खरे पवित्र समाजकारण आहे, असे प्रतिपादन आदिवासी विकास महामंडळाचे संचालक गोकुळ झिरवाळ यांनी केले.
करंजवण येथील मविप्र संचलित, जनता विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयात अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या प्रयत्नातून व गोकुळ झिरवाळ यांच्या सहकार्यातून उभारण्यात येणाऱ्या भोजन कक्षाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाळासाहेब मेधने होते, तर प्रमुख अतिथी म्हणून मविप्र संचालक प्रवीण जाधव उपस्थित होते. या भोजन कक्षामुळे पावसाळ्यात विद्यार्थ्यांना जेवताना होणारी गैरसोय दूर होईल, असे जाधव यांनी सांगितले. या सोहळ्याला विलास ढाकणे, मुक्तीराम चव्हाण, रवींद्र मोरे, पंढरीनाथ बर्डे, भगवान कोंड, मुख्याध्यापक वाय.यू. बैरागी, पर्यवेक्षक बी.के. उफाडे आदी उपस्थित होते. वीरकर के. एम. यांनी सूत्रसंचालन केले, तर रवींद्र मोरे यांनी आभार मानले.
--
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.