सर्व आवृत्तींसाठी
-------------
द्राक्ष क्रॉप कव्हरच्या पूर्वसंमतीला स्थगिती
-----------
सर्वसाधारण प्रवर्गाचा मंजूर कार्यक्रम पूर्ण; ४८ पूर्वसंमती प्रलंबित
-----------
संदीप मोगल : सकाळ वृत्तसेवा
लखमापूर, ता.३१ : राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत द्राक्ष पिकासाठी दिल्या जाणाऱ्या प्लॅस्टिक क्रॉप कव्हरच्या सर्वसाधारण प्रवर्गातील नवीन पूर्वसंमतीला स्थगिती देण्यात आली आहे. मंजूर कार्यक्रम संपुष्टात आल्याने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी तालुका पातळीवर हे निर्देश दिले आहेत. दरम्यान द्राक्ष बागायतदार संघाच्या अधिवेशनात कृषिमंत्र्यांसमोर हा प्रश्न मांडला गेला असता, त्यांनी सकारात्मक तोडग्याचे आश्वासन दिले असले तरी त्याबाबत शासन स्तरावर अद्याप निर्णय झालेला नसताना हे आदेश निघाले आहेत.
--------------
कृषी आयुक्तालयाच्या सूचनांनुसार ही कारवाई करण्यात आली आहे. महाडीबीटी प्रणालीनुसार २०२५-२६ आणि २०२६-२७ या दोन्ही वर्षांतील ४८ पूर्वसंमती आणि ९ मोका तपासण्या प्रलंबित आहेत. सर्वसाधारण प्रवर्गाची पूर्वसंमती स्थगित असली, तरी अनुसूचित जाती व जमाती (SC/ST) प्रवर्गातील पात्र शेतकऱ्यांना पूर्वसंमती देण्याची प्रक्रिया सुरूच राहील.
क्रॉप कव्हर बसवून बिल अपलोड केलेल्या शेतकऱ्यांची आठ दिवसांत मोका तपासणी करून अनुदानाचे प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दुर्लक्ष झाल्यास जबाबदारी तालुका कृषी अधिकाऱ्यांची राहील. तसेच डाळिंबाच्या ''अँटी-हेल नेट'' योजनेतील लाभार्थ्यांना तातडीने पूर्वसंमती देऊन ऑगस्टअखेर प्रस्ताव सादर करण्यास सांगितले आहे.
--------------
कोट
आम्हाला नुकसानभरपाईऐवजी पिकांचे रक्षण करणाऱ्या अशा सुविधांना अनुदान मिळावे. गारपिटीत या कव्हरमुळे पिकांचे संरक्षण झाले आहे. त्यामुळे शासनाने या स्थगितीचा पुनर्विचार करून प्रलंबित अनुदान वर्ग करावे."
- सुरेश कळमकर, संचालक, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.