पान-२ ॲंकर
LKH26B05016 ः हेमंत फड
----------------
वणी पोलिस ठाणे हद्दीत कायदा- सुव्यवस्थेचे आव्हान
प्रभारीपदी हेमंत फड रुजू; ६९ गावे, खेडेपाड्यांमुळे विस्तीर्ण कार्यक्षेत्रामुळे गुन्हेगारीही वाढलेली
संदीप मोगल : सकाळ वृत्तसेवा
लखमापूर ता. ७ : वणी पोलिस ठाण्याच्या प्रभारीपदी हेमंत फड नुकतेच रुजू झाले असून तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे. वणी पोलिस ठाण्याचे कार्यक्षेत्र मोठे असून यात ६९ गावे, खेडे व पाड्यांचा समावेश होतो. खेडगाव आणि कोशिंबे हे आऊटपोस्ट तर वणी, लखमापूर, माळेदुमाला, वणी ग्रामीण ही प्रमुख बिटे आहेत. कळवण उपविभागांतर्गत वणीसह एकूण सात पोलिस ठाणी येतात. यात वणी पोलिस ठाण्याचा गुन्हेगारीचे प्रमाण लक्षणीय असल्याचे सांगितले जाते.
गुजरात व महाराष्ट्र या दोन राज्यांना जोडणारे वणी हे दिंडोरी तालुक्यातील सर्वात मोठे शहरवजा गाव आहे. सुमारे तीन लाख लोकसंख्या या क्षेत्रात राहते. लखमापूर एमआयडीसी, करंजवण, कादवा कारखाना यामुळे औद्योगिक वाद, ग्रामीण टोळीयुद्ध आणि संवेदनशील वस्त्यांचा ताण संपूर्णपणे वणी ठाण्यावर आहे. अवैध दारू विक्री, खुला गुटखा, अमली पदार्थांची रेलचेल, मटका आणि वाळू तस्करी यांसारख्या अवैध धंद्यांवर वचक निर्माण करणे हे नव्या अधिकाऱ्यापुढील मुख्य आव्हान आहे.
१६-१
सामान्य नागरिकांच्या अपेक्षा
मागील काळात राजकीय दबावामुळे अनेक अधिकाऱ्यांचे कार्यकाळ पूर्ण होऊ शकले नाहीत, अशी सर्वसामान्य नागरिकांमध्ये चर्चा आहे. विशेषतः शाळा-कॉलेज परिसरातील रोडरोमिओगिरी, टवाळखोरी आणि दुचाकींचे कर्णकर्कश आवाज यामुळे पालक वर्ग त्रस्त झाला आहे. गायत्री जाधव यांची बदली झाल्यानंतर काही व्यावसायिक मंडळींनी ती रद्द करण्यासाठी प्रयत्न केल्याची चर्चाही परिसरात रंगली होती. वणीकरांना आता केवळ आश्वासने नको, तर ठोस कारवाई हवी आहे. अवैध धंदे पूर्णपणे बंद करणे, रेकॉर्डवरील गुंडांवर तडीपार कारवाई करणे आणि नेत्यांच्या दबावाला बळी न पडता कायद्याचे राज्य प्रस्थापित करणे, हीच हेमंत फड यांच्याकडून वणीकरांची मुख्य अपेक्षा आहे.
----------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.