द्राक्ष व्यापाऱ्याकडून अखेर
शेतकऱ्यांना ६५ लाख अदा
----------
दोन वर्षांपासून होते अडकले; ओझर पोलिसांची कामगिरी
----------
सकाळ वृत्तसेवा
लखमापूर, ता. १४ : दिंडोरी व निफाड तालुक्यातील द्राक्ष उत्पादकांचे तब्बल ६५ लाख रुपये थकीत असल्याने दिंडोरी, ओझर व पिंपळगाव पोलिस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले होते. दोन वर्षांत अनेक शेतकऱ्यांची देणी टप्प्याटप्प्याने अदा केल्यानंतर उर्वरित रक्कमही देण्यासाठी व्यापाऱ्याने पुढाकार घेतला. आर्थिक अडचणीमुळे पैशांची जुळवाजुळव करण्यासाठी बिहार येथे गेलेल्या व्यापाऱ्याला ओझर पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले.
-----------
पोलिस निरीक्षक महेश कुलकर्णी यांच्या पुढाकारातून शेतकरी व व्यापाऱ्यांमध्ये समन्वय साधण्यात आला. शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत व्यापाऱ्याने उर्वरित थकबाकी देण्याची तयारी दर्शविली. त्यानुसार अवघ्या २० दिवसांत शेतकऱ्यांचे सुमारे ६५ लाख रुपये अदा करण्यात आले. त्यामुळे गेल्या काही काळापासून थकीत पैशांच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांच्यात समाधानाचे वातावरण आहे. मुख्य व्यापारी हेमंतकुमार सिंग (रा. आरटीओ कॉर्नर, नाशिक) याच्यासह नितीन जंगल रास्कर (रा. पंचवटी नगर, ओझर मिग) आणि कृष्णा रामनाथ निमसे (रा. नांदूर नाका) यांना नाशिक जिल्हा न्यायालयातून जामीन मिळाल्याची माहिती त्यांच्या वकिलांनी दिली आहे.
--------
कोट
पोलिसांच्या पुढाकारामुळे व्यापाऱ्याशी चर्चा झाली आणि २० दिवसांत आमची थकीत रक्कम मिळाली. पैसे मिळाल्याने आम्हाला दिलासा मिळाला असून पोलिसांचे आम्ही आभार मानतो.
- हरीश वाघ, शेतकरी जानोरी
-------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.