फोटो -14996
मालेगाव : वाहतुकीला अडथळा ठरणारा टेलिफोन खांब
-----
अडसर ठरणारे खांब काढावेत
------------------------
खासगी वीज कंपनीला निवेदन
सकाळ वृत्तसेवा
मालेगाव, ता. १२ : येथील वाडिया हॉस्पिटलजवळील गल्ली वापरासाठी सुरु करावी यासाठी महापालिकेला निवेदन दिले आहे. गल्ली सुरु करण्यापूर्वी गल्लीत टेलिफोन व विजेचे खांब आहे. वाहनचालकांना अडसर ठरत असल्याने हे खांब काढावेत अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष भरत पाटील यांनी खासगी वीज वितरण कंपनीकडे निवेदनाद्वारे केली आहे.
येथील गूळबाजार भागात रस्त्याचे काम सुरु आहे. त्यामुळे तो रस्ता बंद आहे. नागरीकांना ये-जा करण्यासाठी एकच रस्ता आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. वाडिया हॉस्पिटलच्या बाजुची गल्ली सुरु केल्यास रस्त्यावर वाहतूक कोंडी होणार नाही. तत्पूर्वी रस्त्यावर विद्युत व टेलिफोन खांब आहे. या खांबांमुळे वाहनांना जाण्या-येण्यास मोठी अडचण होते. येथे असलेले खांब हे बंद अवस्थेत आहेत. सदर खांब काढावेत अशी मागणी त्यांनी खासगी वीज वितरण कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे. अन्यथा या ठिकाणी जनआंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. निवेदनावर राजू परदेशी, हेमंत प्रजापत, पवन शाहू, पवन हिरे, बाळासाहेब सोनवणे, कल्याण शर्मा, तेजस जैन, अर्जुन पाटील, महेश शर्मा, शाम शर्मा, उदयसिंग परदेशी, दिलीप पाटील आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.