फोटो -15060
मालेगाव : जनगणनेबाबत मुस्लीम धर्मगुरूंना माहिती देताना आयुक्त रवींद्र जाधव
----
ॲंकर
जनगणनेसाठी मुस्लीम धर्मगुरूंना साकडे
---------------------------------
मालेगाव महापालिकेतर्फे प्रबोधनासाठी बैठक
सकाळ वृत्तसेवा
मालेगाव, ता. १४ : येथील महापालिका हद्दीत १ मेपासून जनगणनेचे काम सुरु झाले आहे. त्या अनुषंगाने जनगणना व स्वगणना याबाबत व्यापक जनजागृती केली जात आहे. या संदर्भात महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयात मुस्लिम धर्मगुरूंची बैठक घेण्यात आली.
शहरातील मुस्लिम धर्मगुरू आणि प्रमुख व्यक्तींना आयुक्त रवींद्र जाधव, अतिरिक्त आयुक्त रोहिदास दोरकुळकर यांनी स्वगणना करण्याचे महत्त्व आणि स्वगणना करण्याची प्रक्रिया समाजावून सांगितली. तसेच मुस्लिम धर्मगुरूंना स्वगणनाबाबत जनजागृती करण्याचे आवाहन करण्यात आले.
स्वगणना झाल्यानंतर घरयादी व घरगणना करण्यासाठी मनपातर्फे नियुक्त प्रगणक व पर्यवेक्षक १६ मे १४ जून याकालावधीत घरोघरी जावून प्रत्यक्ष भेट देत संबंधित घरातील सदस्यांची माहिती मोबाईलद्वारे संकेतस्थळावर ॲपवर प्रविष्ट करतील. स्वगणना केली नसेल तरीही मनपाचे नियुक्त प्रगणक घरी येऊन जनगणनेची प्रक्रिया पूर्ण करणार आहेत. जनगणना हे राष्ट्रीय कर्तव्य असून यात जबाबदारी पार पाडावी असे आवाहन करण्यात आले.
नागरिकांनी आवर्जुन स्वगणना करावी. तसेच १६ मे ते १५ जून या कालावधीत प्रगणक घरी येऊन आपल्या माहितीची पडताळणी करतील. जनगणना कार्यवाही पूर्ण करून सहकार्य करावे असे आवाहन आयुक्त जाधव, अतिरिक्त आयुक्त दोरकुळकर यांनी केले. बैठकीस उपायुक्त सुनीता कुमावत, मनपा चार्ज अधिकारी सचिन महाले, श्याम बुरकुल, संतोष गायकवाड, जनसंपर्क अधिकारी पंकज सोनवणे, फहमी अनीस अहमद, अब्दुल अझीम फारानी, अनिस ऊर रहेमान, जुबेर अहमद, मोमीन मोहम्मद, नसीर अहमद अन्सारी, हाफिज अनिस अजहर, जहीर कैसर, मौलाना अब्दुल कय्याम, डॉ. अखलाक अन्सारी, डॉ. रियाज अहमद आदी धर्मगुरू उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.