नाशिक

मालेगावी मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीचे कामामुळे १८ मेचा पाणीपुरवठा १९ मेस होणार

CD
टुडे पान १ वर घ्यावी. ----- जलवाहिनी दुरुस्तीमुळे पाणीपुरवठा विस्कळीत ------------------------------------- सोमवारी गिरणातून मालेगावला पाणीपुरवठा बंद सकाळ वृत्तसेवा मालेगाव, ता. १४ : वीज महावितरण कंपनीकडून १८ मेस गिरणा पंपिंग स्टेशनला विज पुरवठा करणाऱ्या दहीवाळ उपकेंद्र ३३ के.व्ही.चे एक्स्प्रेस लाईनचे दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. गिरणा पंपिंग स्टेशन येथे वीज पुरवठा बंद राहणार आहे. परिणामी १८ मेस पाणीपुरवठा होणार नाही. १८ मेस होणारा पाणीपुरवठा १९ मेस तसेच १९ मेस होणारा पाणीपुरवठा २० मेस केला जाणार आहे. शहरातील ७१ एमएलडी जलशुध्दीकरण केंद्र येथुन येणारी १२०० मिलीमीटर व्यासाची मुख्य जलवाहिनी ही सहारा हॉस्पिटल (उड्डाण पुलाजवळ) जवळ मोठ्या प्रमाणात लिकेज झालेली आहे. सदर जलवाहिनीचे दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. शहरातील दोन उंच जलकुंभ स्वच्छ करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामांसाठी १८ मेस संपुर्ण शहराचा पाणी पुरवठा बंद करुन शट डाऊन घेण्यात आलेला आहे. दुरुस्तीचे काम १८ मेस होणार असल्याने ज्या भागात १८ मेस नियोजित पाणी पुरवठा होणार होता त्या भागात १९ मेस पाणीपुरवठा होईल. १९ मेस ज्या भागात नियोजित पाणीपुरवठा होणार होता त्या भागात २० मेस पाणीपुरवठा केला जाईल. महावितरण कंपनी कडील नियोजित देखभाल दुरुस्तीचे काम पुर्ण झाल्यावर व जलवाहिनी दुरुस्तीचे काम पुर्ण झाल्यावर गिरणा पंपिंग स्टेशन येथुन नियोजनाप्रमाणे दोन दिवसाआड पध्दतीने पाणी पुरवठा पुर्ववत सुरु करण्यात येणार आहे. नागरीकांनी पाणी जपून वापरावे. तसेच वरील तांत्रिक अडचण लक्षात घेवून महापालिका प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Small Savings Schemes: PPF आणि पोस्ट ऑफिस FD गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! पुढील 3 महिन्यांसाठी व्याजदर जाहीर; पाहा नवे दर

५ सामने, ३० चौकार, २९ षटकार अन् ३५५ धावा... Vaibhav Sooryavanshi ची इंग्लंडमधील कामगिरी भारताला विचार करायला लावणारी..

Ramtirth Waterfall : पांढराशुभ्र फेस अन् खळखळणारा आवाज! आंबोलीतील प्रसिद्ध रामतीर्थ धबधबा प्रवाहित; पावसाच्या पाण्यामुळं खुललं सौंदर्य, पर्यटकांची गर्दी

Europe Heatwave: युरोपमध्ये उष्णतेचा कहर! रस्ते वितळले, लोखंडी ट्रॅक वाकले, हजारो नागरिक रुग्णालयात...भयानक व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : मुंबईत मुसळधार पावसाचा विमानसेवेवर मोठा परिणाम; उड्डाणे आणि लँडिंग प्रक्रियेत अडथळे

SCROLL FOR NEXT