मालेगावचा पारा
४२ अंशावर स्थिर
मालेगाव : शहर व परिसरात उन्हाचा तडाखा कायम आहे. गेल्या दोन दिवसापासून पारा ४२ अंशावर स्थिर आहे. चार दिवसापूर्वी पारा ४३.८ अंशावर गेला होता. पारा घसरल्याने शहरवासियांना काहीसा दिलासा मिळाला. शुक्रवारी (ता. १५) दुपारनंतर ऊन - सावलीचा खेळ सुरु झाल्याने नागरीकांना दिलासा मिळाला. किमान तापमान देखील २५.६ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. मालेगावला १२ मेस हंगामातील सर्वोच्च ४३.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. ११ ते १३ मे या कालावधीत पारा ४३ ते ४४ अंशादरम्यान होता. दोन दिवसापासून पारा ४२ अंशावर स्थिरावला आहे. कमाल तापमानाबरोबरच किमान तापमानातही वाढ झाल्याने रात्रीचा उकाडा वाढला आहे. १३ मेस किमान तापमान २८.८ अंश सेल्सिअस एवढे नोंदले गेले. आगामी काळात कडक उन्हाबरोबरच बेमोसमी पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.