15064
शेख जिया शेख हारुण
-----------------------
मालेगावला तरुणाचा खून
सकाळ वृत्तसेवा
मालेगाव, ता. १५ : शहरात खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या २३ वर्षीय तरुणाचा दरेगाव शिवारातील कोकणदरा भागातील कोको बेकरी लगत असलेल्या डोंगराजवळ डोक्यात दगड टाकून खून करण्याची घटना घडली. याप्रकरणी पवारवाडी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. शेख जिया शेख हारुण (वय २३, रा. देवीचा मळा, उमराबाद) असे मृत तरूणाचे नाव आहे. शुक्रवारी (ता. १५) सकाळी अकराच्या सुमारास हा प्रकार समजला.
घटनास्थळी अप्पर पोलिस अधिक्षक सुरज गुंजाळ, साहाय्यक पाेलिस अधिक्षक सिध्दार्थ बारवाल, पवारवाडीचे पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांनी पोलिस पथकासह पाहणी केली. त्याच ठिकाणी फॉरेन्सिक लॅबच्या पथकाने देखील भेट देऊन पुरावे जमा केले. जिया शेख हा जुना आग्रा महामार्गावरील नॅशनल पेट्रोल पंपाजवळ सायंकाळी खाद्यपदार्थ विक्रीसाठी हातगाडी लावत होता. कोकणदरा भागात ज्या ठिकाणी जियाचा खून करण्यात आला त्या परिसरात दोन मोठे यंत्रमाग कारखाने व वस्ती आहे. जियाचा खून करणाऱ्यांनी यापुर्वी या भागात पाहणी केली असावी. त्यानंतर त्यांनी गुरुवारी (ता.१४) मध्यरात्री त्याचा खून केला. मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी पथक तयार करण्यात आले आहे. तसेच परिसरातील सीसीटीव्ही तपासून खून करणाऱ्या संशयितांचा शोध पोलिस घेत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.