जनगणनेच्या दुसऱ्या
टप्प्याला आजपासून सुरुवात
सकाळ वृत्तसेवा
मालेगाव, ता. १५ : मालेगाव शहरात जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात नागरिकांना डिजिटल जनगणना करण्यासाठी १ ते १५ मे दरम्यान मुदत दिली होती. यातील पहिल्या टप्प्यातील दुसऱ्या भागाला शनिवार (ता.१६) पासून सुरवात होईल. यात प्रगणक प्रत्येक घरी जाऊन घरयादी व घरगणनेचे काम करणार आहेत. स्वगणना केली नसल्यास तरी देखील घरगणनेचे काम प्रगणक करतील. यासाठी नागरीकांनी आलेल्या प्रगणकांना अचूक माहिती द्यावी. जनगणनेसाठी आलेले प्रगणक आपणाकडे कोणत्याही प्रकारचे आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक किंवा इतर कागदपत्र मागणार नाहीत. नागरीकांनी प्रगणकांना सहकार्य करावे असे आवाहन आयुक्त रवींद्र जाधव यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.