दुचाकी लावण्याच्या वादातून तरुणाचा खून
बेळगाव पाडे येथील घटना
मालेगाव : तालुक्यातील बेळगाव पाडे येथे दुचाकी लावण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणाचा खून झाल्याची घटना घडली. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध खून व दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेश छगन भामरे (वय २७) यांच्या घरासमोर उभी केलेली दुचाकी बाजूला का लावली, असा जाब विचारल्याचा राग आल्याने मंगेश सुकदेव चव्हाण (वय २७) याने गणेश यांना मारहाण केली. यावेळी सुकदेव कारभारी चव्हाण (वय ५५) व एका महिलेने गणेश यांना पकडून ठेवले. भांडण सोडविण्यासाठी गेलेले छगन धर्मा भामरे यांना मंगेश व सुकदेव यांनी छातीत जोराचा धक्का दिल्याने ते खाली कोसळले. उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. विलास पुंडलिक चव्हाण यानेही धमकी दिल्याची तक्रार आहे. वडनेर खाकुर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दीड लाखांचे दागिणे
गवळीवाड्यात लंपास
मालेगाव : शहरातील कॅम्प भागातील गवळीवाडा परिसरात भरदिवसा घरफोडी करून चोरट्यांनी सुमारे दीड लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. मल्लुशेट बंगला परिसरातील रोहित राजेंद्र यादव (वय ३२) यांच्या घरातील बेडरूममधील लाकडी कपाट फोडून चोरट्यांनी १ लाख ५१ हजार ७७५ रुपयांचे दागिने चोरून नेले. १६ जून रोजी सकाळी साडेदहा ते दुपारी तीनदरम्यान ही घटना घडली. कॅम्प पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारच्या धडकेत
झोडगेत दोघे जखमी
मालेगाव : मुंबई-आग्रा महामार्गावरील झोडगे शिवारात कारने दुचाकीला धडक दिल्याने दोघेजण गंभीर जखमी झाले. योगेश दगडू पाटील व एकनाथ मन्साराम पाटील (दोघे रा. मांदुर्णे, ता. चाळीसगाव) हे दुचाकीने धुळ्याकडे जात असताना पाठीमागून आलेल्या कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले. शनिवारी (ता. २०) सायंकाळी सहाच्या सुमारास हा अपघात झाला. तालुका पोलिस ठाण्यात कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सटाणा नाका परिसरातील
तरुणाचा आजाराने मृत्यू
मालेगाव : सटाणा नाका परिसरातील एका तरुणाचा रक्ताच्या उलट्या झाल्यानंतर मृत्यू झाला. या प्रकरणी कॅम्प पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.कुणाल कुमार चौधरी (वय ३२, रा. साईधाम अपार्टमेंट, सटाणा नाका) हे रविवारी (ता. २१) सायंकाळी राहत्या घरी अंघोळ करत असताना अचानक रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या. मित्र देवनाथ शहा यांनी त्यांना खासगी रुग्णालयात नेले. त्यानंतर नातेवाईक अजयसिंग रामसिंग यांनी सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. पोलिस अधिक तपास करीत आहेत.
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.