नाशिक

शेतकऱ्यांनी ७५ मिलीमीटर पाऊस पडल्याशिवाय पेरणी करु नये- गोर्डे

CD
७५ मिलीमीटर पावसाशिवाय पेरणी करु नये ः गोर्डे सकाळ वृत्तसेवा मालेगाव, ता. २३ : मालेगावसह कसमादे परिसरात सोमवारपासून (ता. २२) वरुणराजा कोसळत आहे. १९.३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. दरम्यान, कमी पावसात शेतकऱ्यांनी पेरणी करु नये असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे. मृग नक्षत्र संपले आहे. त्यामुळे पावसाने हजेरी लावली आहे. पाऊस पडल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. शेतकरी बांधवांनी एप्रिल व मे मध्ये शेतीची मशागत करुन ठेवली होती. पाऊस पडल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून आतापर्यत १९.३ मिलीमीटर पाऊस झाल्याने शेतीच्या कामांना वेग आला आहे. मात्र, दमदार पाऊस पडल्यावरच शेतात लागवड करावी. २२ जूनपासून आर्द्रा नक्षत्र ५ जुलैपर्यंत असणार आहे. शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करु नये. तीन ते चार इंच ओल असल्यावरच पेरणी करावी. तालुक्यात ७५-१०० मिमी पाऊस पडल्याची नोंद झाल्यानंतरच पेरणी करावी. कमी पडलेल्या पावसात पेरणी केल्याने जमिनीत गरम वाफा निघतात. त्यामुळे बीज खराब होण्याची शक्यता आहे. - भगवान गोर्डे तालुका कृषी अधिकारी, मालेगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT