नाशिक

तालुक्यात महावितरण विभागाकडून पूर्व पावसाळी कामे अंतिम टप्प्यात

CD
फोटो 15327 मालेगाव कॅम्प : विजेच्या तारांना अडथळा ठरणाऱ्या झाडाच्या फांद्या छाटताना महावितरणचे कर्मचारी ----- फोटो - 15328 मालेगाव कॅम्प : झाडाच्या फांद्या छाटताना महावितरणचे कर्मचारी मेन पाऊसही सूरू अन पूर्व पावसाळी कामही.. ---------------------------------- तालुक्यात महावितरणचे कामे अंतिम टप्प्यात सकाळ वृत्तसेवा मालेगाव कॅम्प, ता.२३ : पावसाळा ऋतू सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर संभाव्य धोके टाळण्यासाठी तालुक्यातील महावितरण विभागाकडून मान्सून पूर्व देखभाल दुरुस्तीची कामे केली जातात. मात्र यंदा पावसाळाच लांबल्याने पूर्व पावसाळी कामेही लांबली आहे. दोन दिवसांपासून एकाचवेळी पाऊसही सुरू आहे. त्याचवेळी पूर्व पावसाळी कामेही सुरु असल्याचे चित्र आहे. शहरी व ग्रामीण भागाचे कामे अंतिम टप्प्यात आली आहेत.झाडांच्या फांद्या छाटणे, विजेच्या तारांना ताण देऊन दुरुस्त करणे, वादळी वाऱ्यात पडलेले विजेचे खांब दुरुस्त करणे, लोंबकळणाऱ्या तारा, गावोगावच्या विजेच्या ट्रांसफार्मर मधील तेल बदलणे, विजेच्या तारांना घासणाऱ्या झाडांची पाहणी करून फांद्या तोडणे, उघड्या विजेच्या तारांना आवर घालणे यासह विविध देखभाल दुरुस्तीच्या कामांना गती आली आहे. पावसाळ्यात विजेचे खांब धोकादायक खांबापासून सुरक्षित अंतर ठेवा. वीज तारा लोंबकळत असतील तर वीज वितरण कंपनीला माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शहरी व ग्रामीण भागातील महावितरणच्या कर्मचाऱ्यांना माहिती देऊन दुरुस्तीची कामे करून घ्यावी. गावातील महावितरण कंपनी कर्मचारी नागरिकांची दखल घेत मान्सून पूर्व कामे अंतिम टप्प्यात आहे. चौकट इथे सुरु आहे काम. मुंगसे सेक्शन, मालेगाव कॅम्प फीडरमधील अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या महावितरण कर्मचारी यांच्याकडून तोडल्याने ग्रामीण भागात विजेचा अडथळा कमी झाला आहे. यात अभियंता विनीत राऊत, गजेंद्र चव्हाण, पंकज सोनवणे, राहुल शेवाळे, वैभव शेवाळे आदीच्या मार्गदर्शनाखाली कामे सुरू आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sainik Takli Protest : आमदार यड्रावकरांच्या समर्थकांकडून सैनिक टाकळीच्या आंदोलकांना मारहाण?, शिरोळ तालुका बंदची हाक; तिरंग्याच्या काठीने मारल्याला आरोप

Panvel-Karjat Railway Line: कर्जतहून नवी मुंबई आता आणखी जवळ! नवा रेल्वेमार्ग लवकरच खुला होणार; किती टक्के काम पूर्ण?

Koyna Dam: कोयना धरणाच्या दरवाजातून होणार विसर्ग पुर्णपणे बंद; धरणात सध्या 93.02 टीएमसी पाणीसाठा

Yavatmal Politics: जमिनीवर बसले, काळा चहा घेतला, झुनका-भाकरी खाल्ली; पालकमंत्री संजय राठोडांचा आदिवासी बांधवांसोबत दिवस

Religious Travel: ६ महिने स्केटिंग, ३ महिने सायकलिंग! श्रद्धेला जिद्दीची साथ; बाराही ज्योतिर्लिंगांसाठी निघालेल्या दोन तरुणांची अनोखी कहाणी

SCROLL FOR NEXT