नाशिक

अखेर जिजामाता उद्यान समोरील रस्त्यावरील खड्डे बुजविले

CD
सकाळ बातमीचा परिणाम ----- फोटो 15333 मालेगाव कॅम्प : सोयगाव जिजामाता उद्यान जवळील रस्त्यावरील मातीने बुजलेले खड्डे ----- फोटो 15334 मालेगाव कॅम्प : एकीकडे याच रस्त्यावरील सोडलेले अर्धवट खड्डे ----- फोटो 15335 मालेगाव कॅम्प : २१ जून रोजी सकाळमध्ये प्रसिध्द झालेली बातमी ---- ॲंकर अखेर जिजामाता उद्यान रस्ते दुरुस्ती सकाळमधील बातमीनंतर रस्त्यावरील खड्डे बुजविले सकाळ वृत्तसेवा मालेगाव कॅम्प, ता.२४ : मालेगाव शहरातील डी.के येथील जिजामाता उद्यान जवळील रस्त्यांवर मोठ मोठे खड्डे पडले होते. सर्वत्र धुळीचे लोट उठून उद्यानात फेरफटका मारणारे व रस्त्यावरील लहान मुले,जेष्ठ नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यासंदर्भात सकाळमध्ये (ता.२१ जून) बातमी प्रसिध्द झाल्यानंतर महापालिकेने दखल घेत जिजामाता उद्यान ररस्त्यावरील खड्डे तत्काळ बुजविले. दरम्यान मात्र ते बुजवितांना त्यासाठी मातीचा वापर करून नागरिकांची तात्पुरती समजूत काढल्याचा आरोप आहे. पावसाळ्याचे दिवस असताना जोराच्या पावसात माती वाहून पुन्हा खड्डे जैसे थे होतील. याचा विचार करणे अत्यंत गरजेचे होते. प्रशासनाने याठिकाणी रस्ता डांबरिकरणाचा आहे तर माती पेक्षा डांबर टाकणे गरजेचे असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे. मालेगाव येथील जिजामाता उद्यान समोरील रस्त्याकडे गेल्या २ वर्षापासून प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. पावसाळ्या पूर्वी रस्त्यांची कामे होणे अत्यंत गरजेचे होते.पावसाळा सुरू होऊन रस्त्यावरील खड्डे, मातीमुळे अपघातांचे प्रमाण वाढते. सोयगाव भागातील काही कॉलनीमध्ये पायी चालणे देखील जिकरीचे झाले आहे . तरी देखील सुस्तावलेल्या प्रशासनाला जाग येत नसल्याने नागरिकानी मालेगाव महापालिकेच्या ढिसाळ नियोजनावर संताप व्यक्त केला आहे. येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांनी व शाळेतील लहान मुले,वाहन चालकानी रस्त्यावरील खड्डे बुजल्याने समाधान व्यक्त केले आहे. नवीन रस्ता कधी डी.के रस्ता, कॉलेज स्टॉपकडे जाणारा रस्ता व पाटबंधारे विभागाकडे जाणारा आजूबाजूचे रस्ते सीमेंट काँक्रीट व डांबरीकरणमुळे चकाचक आहेत. मग जिजामाता उद्यान जवळील २५० मीटर अंतराचा नवीन रस्ता कधी होणार हा स्थानिकांचा प्रश्न कायम आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sainik Takli Protest : आमदार यड्रावकरांच्या समर्थकांकडून सैनिक टाकळीच्या आंदोलकांना मारहाण?, शिरोळ तालुका बंदची हाक; तिरंग्याच्या काठीने मारल्याला आरोप

Panvel-Karjat Railway Line: कर्जतहून नवी मुंबई आता आणखी जवळ! नवा रेल्वेमार्ग लवकरच खुला होणार; किती टक्के काम पूर्ण?

Koyna Dam: कोयना धरणाच्या दरवाजातून होणार विसर्ग पुर्णपणे बंद; धरणात सध्या 93.02 टीएमसी पाणीसाठा

Yavatmal Politics: जमिनीवर बसले, काळा चहा घेतला, झुनका-भाकरी खाल्ली; पालकमंत्री संजय राठोडांचा आदिवासी बांधवांसोबत दिवस

Religious Travel: ६ महिने स्केटिंग, ३ महिने सायकलिंग! श्रद्धेला जिद्दीची साथ; बाराही ज्योतिर्लिंगांसाठी निघालेल्या दोन तरुणांची अनोखी कहाणी

SCROLL FOR NEXT