नाशिक

निवडणूक आरक्षणाबाबतीत ओबिसी समाजावर अन्यायाबाबत निवेदन

CD
फोटो -15344 मालेगाव : अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयातील लिपिक भारत भगत यांना निवेदन देतांना ओबीसी संघटना व महात्मा फुले समता परिषदेचे पदाधिकारी ---- निवडणूक आरक्षणात ओबीसी’वर अन्याय महात्मा फुले परिषद, ओबीसी संघटनेचे निवेदन सकाळ वृत्तसेवा मालेगाव, ता. २५ : आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या आरक्षण प्रक्रियेत ओबीसी (इतर मागासवर्गीय) असा स्पष्ट उल्लेख नसल्याने ओबीसी समाजावर अन्याय होत असल्याचा आरोप करत न्यायालयाचा निकाल येईपर्यंत निवडणुका स्थगित ठेवाव्यात, अशी मागणी ओबीसी संघटना व महात्मा फुले समता परिषदेतर्फे करण्यात आली. यासंदर्भात अप्पर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य निवडणूक आयोगाला निवेदन देण्यात आले. निवेदनात, ग्रामपंचायत निवडणुकीसंदर्भातील आरक्षण आदेशात ओबीसी अथवा इतर मागासवर्गीयांचा स्पष्ट उल्लेख नसल्याने समाजात संभ्रम निर्माण झाला आहे. या आदेशाविरोधात न्यायालयात प्रकरण प्रलंबित असून निकाल लागेपर्यंत निवडणूक प्रक्रियेत ओबीसी आरक्षणाचा स्पष्ट उल्लेख करावा. तसेच न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत ग्रामपंचायत निवडणुका घेऊ नयेत, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी ओबीसी संघटनेचे अध्यक्ष रमेश उचित यांनी प्रास्ताविक केले. नितीन शेलार यांनी शासनाच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली. समता परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र सोनवणे, धर्मा भामरे, राजेश वैद्य, चेतन महाले, संजय दोडे, रवींद्र चौधरी, जितेंद्र चव्हाण, ज्ञानेश्वर भांडारकर, सतीश बोरसे, संजय लाडके, बापू वाघ, अरुण सोनटक्के, रमेश जगताप, जयघोष जाधव, भाऊसाहेब जाधव यांच्यासह तालुक्यातील ओबीसी समाजबांधव उपस्थित होते. अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयातील लिपिक भारत भगत यांना निवेदन देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

चारित्र्य पडताळणी दाखला कसा काढायचा? महा-ई-सेवा केंद्रातून ‘या’ वेबसाईटवर करा अर्ज, १५९ रुपयांच्या शुल्कात ७ दिवसांत मिळेल दाखला, वाचा...

आजचे पंचांग १० ऑगस्ट २०२६! सोमप्रदोषासह जाणून घ्या शुभ-अशुभ वेळा

Falahari Sandwich: उपवासात रोज साबुदाणा नको! झटपट बनवा चटपटीत फलाहारी सँडविच; चवीसोबत पोटही राहील भरलेलं

आजचे राशिभविष्य - १० ऑगस्ट २०२६

ढिंग टांग : आखरी रस्ता : एक पाहणी..!

SCROLL FOR NEXT