नाशिक

मालेगावसह कसमादेसाठी १० जुलैला चणकापूरचे आवर्तन

CD
टुडे पान १ ---- मालेगावसह कसमादेसाठी १० जुलैला चणकापूरचे आवर्तन -- पाणीटंचाईचे संकट: अनेक योजनांमध्ये जेमतेम दहा दिवस पुरेल इतकाच जलसाठा सकाळ वृत्तसेवा मालेगाव, ता. २६ : मालेगाव शहरासह कसमादे भागातील विविध पाणीपुरवठा योजनांवर पाण्याचा ताण वाढला असून, अनेक योजनांमध्ये जेमतेम दहा ते बारा दिवस पुरेल इतकाच जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे चणकापूर धरणातून पिण्याच्या पाण्यासाठीचे तिसरे व यंदाचे शेवटचे आवर्तन १० जुलैला सोडले जाण्याची शक्यता आहे. --- गेल्या वर्षी समाधानकारक पावसामुळे बहुतांश धरणांमधून पहिले आवर्तन फेब्रुवारीत सोडण्यात आले. मात्र, यंदा मालेगावसह कसमादे परिसरातील धरणांमध्ये सरासरी केवळ २० टक्के जलसाठा असून, गेल्या वर्षी याच दिवशी तो ३८ टक्के होता. सध्या चणकापूर धरणात ७५० दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक आहे. आवर्तनासाठी सुमारे ३५० ते ४०० दशलक्ष घनफूट पाणी मंजूर होण्याची शक्यता असून ते साधारण आठवडाभर सुरू राहील. दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे गिरणा नदीचे पात्र ओले असल्याने आवर्तन सोडणे सुलभ होणार आहे. चणकापूर धरणातून गिरणा नदी व डाव्या कालव्याद्वारे महापालिकेच्या तळवाडे साठवण तलावात पाणी पोहोचते. तळवाडे तलावात सध्या ३४ दशलक्ष घनफूट पाणी असून ते आणखी सुमारे २० दिवस पुरेल. चणकापूरच्या आवर्तनाचा लाभ मालेगावसह कसमादेतील ५२ लहान-मोठ्या पाणीपुरवठा योजनांना होणार आहे. हरणबारी धरणात ४०२ दशलक्ष घनफूट जलसाठा असून तेथूनही लवकरच आवर्तन सोडले जाणार आहे. त्याचा लाभ मोसम खोऱ्यातील गावांना मिळेल. केळझर धरणात २५८, पुनंदमध्ये ६२, नागासाक्यात १५ दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक असून माणिकपुंज धरण कोरडे पडले आहे. मालेगाव शहरासह जळगाव जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या गिरणा धरणात सध्या ४ हजार ५६९ दशलक्ष घनफूट जलसाठा उपलब्ध आहे. ----- चौकट कसमादेतील धरणसाठा (दशलक्ष घनफूटात) --- धरणाचे नाव - साठवण क्षमता - आजचा पाणीसाठा - टक्केवारी चणकापूर - २४२७ - ७५० - ३०.९० हरणबारी - ११६६ - ४०२ - ३४.४८ केळझर - ५७२ - २५८ - ४५.१० नागासाक्या - ३९७ - १५ - ३.७८ गिरणा - १८५०० - ४५६९ - २४.७० पुनद - १३०६ - ६२ - ४.७६ माणिकपुंज - ३३४ - ०० - ०० ---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रात आता रेस्टॉरंटमध्ये बाटलीबंद पाणी खरेदीची सक्ती नाही; FDA कडून आदेश लागू, नवीन नियम नेमके काय आहेत?

IND vs IRE 1st T20I Live: वैभव सूर्यवंशीला का नाही खेळवले? श्रेयस अय्यर बघा काय म्हणाला; आमच्याकडे अनुभवी खेळाडू आहेत अन्...

रोज केस धुवू शकत नाही म्हणून... केसांसाठी 'हा' शॅम्पू वापरते प्राजक्ता गायकवाड; स्वतः सांगितलं नाव आणि उपयोग

Mahanagar Gas Limited: 90 दिवसांत PNG घ्या, नाहीतर LPG बंद! मुंबईकरांसाठी महत्त्वाची सूचना

IND vs IRE 1st T20I Live: वैभव सूर्यवंशीचे पदार्पण झाले का? श्रेयस अय्यरच्या निर्णयाने सारे चकीत... पाहा भारताची प्लेइंग इलेव्हन

SCROLL FOR NEXT