सेकंड
--
फोटो - 15349 (घेऊ नये)
मालेगाव : येथील हुसैनी मशीद जवळ मातम करतांना शिया बांधव..
-----------------
मालेगावात शिया समाजाच्या ताबुतांचे विसर्जन
इस्लामिक वर्षाला सुरूवात; आज सुन्नी बांधवांच्या ताबुतांच्या मिरवणुका
सकाळ वृत्तसेवा
मालेगाव, ता. २६ : प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे नातू इमाम हसन-हुसैन यांच्या स्मृतीला मोहरम सणानिमित्त उजाळा देण्यात आला. शहरात शिया समाज बांधवांनी शुक्रवारी (ता. २६) मिरवणूक काढत मातम केला. गुलशेरनगर डेपो भागातील शिया कब्रस्तानात आलम पंजासोबत ताजियांचे विसर्जन केले. सुन्नी पंथियांकडून शनिवारी (ता. २७) मिरवणूक काढली जाणार आहे. सायंकाळी ताबुतांचे (ताजिया) विसर्जन केले जाणार आहे.
--
इस्लामिक वर्षाला मोहरम सणापासून सुरुवात होते. शहरातील विविध मशिदींमधून इमाम हसन-हुसैन यांच्या जीवनावर प्रकाशझोत टाकत त्यांच्या बलिदानाविषयी माहिती देण्यात आली. मोहरमनिमित्त येथे महिन्यापासून ताबुत तयार केले जात होते. दहा दिवस शिया बांधवांकडून दुवा पठण केले जाते. शहरात सुन्नी पंथीयांकडून मोहरमनिमित्त शनिवारी (ता. २७) ताबुतांची मिरवणूक काढली जाईल. येथील रमजानपुरा, द्याने, आयशानगर, इस्लामपुरा, पवारवाडी यासह शहरातील विविध भागांतून ताबुत विसर्जनासाठी आणले जातात. येथील चंदनपुरी गेटजवळील शिया मशिदीजवळ सर्व ताबुत जमा होतील. शहरातून सुमारे लहान-मोठे दोनशेपेक्षा अधिक ताजियांचे सायंकाळी उशिरापर्यंत विसर्जन केले जाणार आहे.
---
पोलिसांचा खडा पहारा
शहरात मोहरमनिमित्त अपर पोलिस अधीक्षक सूरज गुंजाळ यांनी मोठ्या बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. त्याअनुषंगाने येथे पोलिसांचा बंदोबस्त वाढला आहे. येथे १ हजारपेक्षा अधिक पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. त्यामुळे पोलिस यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे.
--
असा असेल बंदोबस्त
अपर पोलिस अधीक्षक - १
सहाय्यक पोलिस अधीक्षक - २
पोलिस निरीक्षक व इतर - २८
पोलिस शिपाई - २८०
राज्य राखीव दलाच्या तुकड्या - २०० पोलिस
आरएएफ - १ तुकडी
गृहरक्षक दलाचे जवान - ४१३
---
शिया बांधवांनी मातम करत काढला जुलूस
शिया बांधवांनी हुसेनी मशिदीपासून शुक्रवारी (ता. २६) सकाळी नऊपासूनच जुलूस काढला. यात २ आलम पंजा, २ ताजिया, १ घोडा होता. मातममध्ये तरुणांनी डोक्यावर, पाठीवर, छातीवर लोखंडी वस्तूच्या साहाय्याने मारून ‘या हुसेन हम नही थे’ असे म्हणत शोक व्यक्त केला. यातील काही तरुण रक्तबंबाळ झाले होते. याठिकाणी अग्निशमन बंब देखील तैनात करण्यात आले होते. सायंकाळी उशिरापर्यंत शिया कब्रस्तानात दुवा पठण करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.