तरुणाच्या आत्महत्येप्रकरणी
पत्नीसह सासरच्यांवर गुन्हा
सकाळ वृत्तसेवा
मालेगाव, ता. २६ : येथील कॅम्प भागातील साने गुरुजी नगरात गुरुवारी (ता. २५) रात्री अनिकेत बाळासाहेब जगताप (वय २७) या तरुणाने केलेल्या आत्महत्येप्रकरणी कॅम्प पोलिसांनी तपास करत पत्नीसह सासू-सासरे व मामेसासू यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
अनिकेत जगताप याचा वर्षभरापूर्वी पंचशील नगरातील श्रुती (वय २२) हिच्याशी विवाह झाला होता. मात्र, विवाह झाल्यापासूनच दोघांमध्ये सतत वाद होत होते. श्रुती ही नांदायला येत नसल्याने आणि तिने अनिकेतविरुद्ध पोलिसात तक्रार केल्याने तो गेल्या काही महिन्यांपासून मानसिक तणावाखाली होता. याच त्रासाला कंटाळून अखेर त्याने टोकाचे पाऊल उचलत राहत्या घरात गळफास घेतला.
या प्रकरणी सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, अनिकेतचे वडील बाळासाहेब जगताप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कॅम्प पोलिसांनी अनिकेतचा मानसिक छळ केल्याप्रकरणी पत्नी श्रुती जगताप, सासू वंदना सुभाष धिवरे, सासरे सुभाष सुकदेव धिवरे आणि मामेसासू उज्वला सतीश पवार (सर्व रा. पंचशील नगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच चौघेही संशयित फरार झाले असून, सहाय्यक पोलिस निरीक्षक पंकज निकम पुढील तपास करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.