शेततळ्यात
तरुणाचा मृतदेह
मालेगाव : तालुक्यातील जळगाव (गा.) येथील दीपक ज्ञानेश्वर सोनवणे (वय २६) यांचा शेततळ्यात मृतदेह आढळून आला. बुधवारी (ता. २) ते घरातून कामासाठी गेले होते. दुपारी साडेबाराच्या सुमारास शेती महामंडळाच्या ब्लॉक क्रमांक २० बी येथील शेततळ्यात ते पडलेल्या अवस्थेत आढळले. भाऊ राजू सोनवणे यांनी त्यांना सामान्य रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. ठाकरे यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. वडनेर खाकुर्डी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.
चंदनपुरी भागात
शेळी, बोकड लंपास
मालेगाव : चंदनपुरी (ता. मालेगाव) येथील महादेव वस्तीतील राजू रतन जाधव (वय ६०) यांच्या घराजवळून चोरट्यांनी दोन शेळ्या व एक बोकड चोरून नेला. चोरीला गेलेल्या बकऱ्यांची किंमत प्रत्येकी पाच हजार, तर बोकडाची किंमत पाच हजार रुपये आहे. १ सप्टेंबरच्या मध्यरात्री ते २ सप्टेंबरच्या पहाटे चारदरम्यान हा प्रकार घडला. या प्रकरणी विजय विनोद जगताप (वय १९, रा. आंबेडकर चौक, चंदनपुरी) व महेश महेंद्र लोंढे (वय १८, रा. मुंजोबा चौक, चंदनपुरी) यांच्याविरुद्ध किल्ला पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.
मालेगाव येथे
तरुणास मारहाण
मालेगाव : बडी मालेगाव हायस्कूलमधील कॅन्टीनसमोर मागील भांडणाची कुरापत काढून तरुणास मारहाण केल्याची घटना ३१ ऑगस्टला दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. युसुफखान शकील खान (वय ३६, रा. मास्टरनगर) यांना फिरोज पटेल (रा. मास्टरनगर) याने शिवीगाळ करून डाव्या डोळ्यावर व मानेवर मारहाण केली. तसेच ‘‘तुझा गेम करून टाकेल,’’ अशी धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. झटापटीत युसुफखान यांचे २,५०० रुपये पडून गहाळ झाले. याप्रकरणी पवारवाडी पोलिस ठाण्यात फिरोज पटेल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.