बालिका अत्याचार व खून प्रकरणात
ॲड. निकम यांचा अंतिम युक्तिवाद
सकाळ वृत्तसेवा
मालेगाव, ता. ७ : डोंगराळे (ता. मालेगाव) येथील चारवर्षीय बालिकेवर झालेला अत्याचार व खून प्रकरणी येथील जलदगती न्यायालयात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या अंतिम युक्तिवादास सोमवारी (ता. ७) सुरुवात झाली. जवळपास तीन तासांच्या युक्तिवादात आरोपीने बालिकेवर अत्याचार करून तिचा करगोट्याने गळा आवळून खून केल्याचे त्यांनी न्यायालयात सांगितले. युक्तिवादात डीएनए अहवाल व इतर वैद्यकीय अहवालांचा दाखला दिला.
डोंगराळे येथे १६ नोव्हेंबर २०२५ ला चारवर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून करण्यात आला होता. या प्रकरणाचे पडसाद खानदेशसह राज्यात सर्वत्र उमटले होते. खटल्यासाठी शासनाने विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली आहे. खटला येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश तसेच विशेष न्यायालयाचे न्यायाधीश के. जी. पालदेवार यांच्यासमोर सुरू आहे. खटल्यात आतापर्यंत सर्व साक्षीदारांच्या साक्षी व उलटतपासणीचे काम पूर्ण झाले. खटल्यातील अंतिम युक्तिवादास सुरुवात झाली. ॲड. निकम यांनी युक्तिवादात घटनाक्रम विशद केला. आरोपीने बालिकेवर कशा पद्धतीने अत्याचार करून तिचा करगोट्याने गळा आवळून खून केला, घटनेच्या वेळी संशयित आरोपीच्या घरात पीडितेचे रक्त संशयिताने स्वत:च्या कपड्याने पुसले. त्या कपड्यात पीडित मुलीला गुंडाळून बंद मोबाईल टॉवरच्या कंपाउंडमध्ये फेकून दिले. संशयिताच्या कपड्यांवर पीडितेच्या रक्ताचे डाग मिळून आले, असे सांगतानाच सदर रक्ताचे डाग पीडित मुलीच्याच रक्ताचे असल्याचा डीएनए अहवालाचा दाखला ॲड. निकम यांनी युक्तिवादात दिला. वैद्यकीय व फॉरेन्सिक अहवालाचे दाखल देत परिस्थितीजन्य पुरावे युक्तिवादात मांडले. या वेळी येथील विशेष सरकारी वकील संजय सोनवणे उपस्थित होते. ॲड. निकम यांचा अंतिम युक्तिवाद मंगळवारी (ता. ८)ही सुरू राहणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.