नाशिक

राज्यातील १४ शिक्षक ''सीसीआरटी'' प्रशिक्षणास दिल्लीला

CD
फोटो -15841 दिल्ली : येथील केंद्रीय संस्कृती मंत्रालयाच्या माध्यमातून सांस्कृतिक स्रोत विभागाच्या प्रशिक्षणात सहभागी राज्यातील शिक्षक. --- राज्यातील १४ जि.प. शिक्षक ‘सीसीआरटी’ प्रशिक्षणास दिल्लीला सकाळ वृत्तसेवा मालेगाव, ता. ९ : राज्यातील १४ जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षक दिल्ली येथे प्रशिक्षणासाठी रवाना झाले आहेत. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील राजेंद्र दिघे यांचा समावेश आहे. केंद्रीय संस्कृती मंत्रालयाच्या माध्यमातून सांस्कृतिक स्रोत व प्रशिक्षण विभागाच्या द्वारका (नवी दिल्ली) येथील देशातील मुख्य प्रशिक्षण केंद्रात ‘हस्तकला व कौशल्यांचा शिक्षणात समावेश’ या विषयावर ८ ते १७ सप्टेंबर या कालावधीत हे प्रशिक्षण होणार आहे. या प्रशिक्षणात देशातील विविध ११ राज्यांतील ६५ शिक्षक सहभागी झाले आहेत. यामध्ये राज्यातील विविध जिल्ह्यांतील १४ शिक्षक सहभागी झाले आहेत. यामध्ये राजेंद्र दिघे (दापुरे, जि. नाशिक), दत्तात्रय सोनवणे (मारवड, जि. जळगाव), रवींद्र शिंदे (सुलवाडे, जि. नंदुरबार), तानाजी गवळी (जि. अहिल्यानगर), चंदा सारसेकर (मानकुरवाडी, जि. बीड), वसुंधरा धोटे (गावसूत, जि. नागपूर), आयेशा नदाफ (नेर्ले, जि. सांगली), अनिता भटकर (लामकाना तांडा, जि. छत्रपती संभाजीनगर), बापूराव भडंगे (तेरखेडा, जि. धाराशिव), करुणा मोहिते (निगडी, जि. सांगली), स्वाती गवई (पळशी तांडा, जि. छत्रपती संभाजीनगर), संजय पाटे (आनंदनगर, जि. सोलापूर), बलराज जाधवर (वाकडी, जि. लातूर), योहान गावित (लोखंडफळी, जि. नंदुरबार) यांचा समावेश आहे. प्रशिक्षण कालावधीत दहा दिवसांत हस्तकलेतील विविध प्रकारचे मार्गदर्शन व शिक्षण मिळणार आहे. एक दिवस दिल्ली दर्शन ‘सीसीआरटी’ माध्यमातून घडविण्यात येणार आहे. राज्याच्या शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या संयुक्त संचालिका डॉ. कमलादेवी आवटी यांच्या आदेशानुसार या शिक्षकांची निवड झाली आहे.

Duleep Trophy: तिलक वर्मा ९९ धावांवर आऊट अन् मग वैभव सूर्यवंशी, ईशान किशनसह पूर्व विभागानं जे केलं, त्यानं जिंकली कोट्यवधींची मनं!; Video

CSMT Redevelopment : सीएसएमटीचा ‘वर्ल्ड हेरिटेज’ दर्जा; पुनर्विकासाने मात्र रेल्वेचीच कोंडी! प्लॅटफॉर्म १६-१७ सात महिन्यांपासून बंद, आता १४-१५ ताब्यात देण्याची मागणी

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री झाल्यानंतर विजय यांचा पहिलाच परदेश दौरा

MLA Manoj Kayande : सिंदखेड राजा मतदारसंघांमध्ये कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

Pune News : विद्यानंद बापट हल्ला प्रकरणातील संतोष चव्हाणचा जामीन न्यायालयाने फेटाळला

SCROLL FOR NEXT