नाशिक

घात - अपघात

CD
पोलिसपाटलाला मारहाण प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा मालेगाव : अजंग येथील भवानी टेकडीजवळील पेट्रोलपंपाजवळ काष्टीचे पोलिसपाटील योगेश प्रल्हाद देसले (वय ३४) यांना तिघांनी मारहाण करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला. बबलू टायर दुकानदाराने फोन करून देसले यांना पेट्रोलपंपाजवळ बोलावले. तेथे एका महिलेने मुलगा बबलू दारू विक्री करीत असल्याचे पोलिसांना का सांगितले, अशी कुरापत काढून त्यांना मारहाण केली. याप्रकरणी वडनेर खाकुर्डी पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. क्रुझरच्या धडकेत महिलेचा मृत्यू मालेगाव : अजंग-पिंपळगाव रस्त्यावरील म्हसोबा मंदिराजवळ क्रुझरने ॲपेरिक्षाला दिलेल्या धडकेत अलकाबाई फकिरा अहिरे यांचा मृत्यू झाला. अलकाबाई ॲपेरिक्षातून (एमएच ४१ सी ८६५१) प्रवास करीत होत्या. पाठीमागून आलेल्या क्रुझरने (एमएच १९ बीपी ३९६८) धडक दिल्याने त्या खाली पडून गंभीर जखमी झाल्या. वडनेर खाकुर्डी पोलिस ठाण्यात क्रुझरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. स्कार्पिओच्या धडकेत पिता-पुत्र जखमी मालेगाव : चौकटपाडे-निमगाव रस्त्यावरील भगवंत पेट्रोलपंपाजवळ स्कार्पिओने दुचाकीला धडक दिल्याने कैलास पंढरीनाथ पारखे (वय ६५) व त्यांचा मुलगा संदीप जखमी झाले. दोघे होंडा शाईन दुचाकीने (एमएच ४१ एआर ८३७७) निमगावकडे जात होते. समोरून आलेल्या स्कार्पिओने (एमएच ४१ बीएच ५३३९) धडक दिली. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात चालक नीरज प्रेमचंद पारख (रा. निंबायती) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: ३ दिवस धो-धो कोसळणार! पावसाबद्दल मोठी अपडेट, राज्यातील 'या' जिल्ह्यांना अलर्ट

Xi Jinping India Visit: शी जिनपिंग यांचा भारत दौरा निश्चित! पंतप्रधान मोदी यांचं निमंत्रण स्वीकारलं, सात वर्षांनंतर देशात येणार

IND vs AFG : भारत-अफगाणिस्तान पहिल्या सामन्यावर संकट! दिल्ली पोलिसांचे पत्र अन् उडाली खळबळ; नेमकं काय घडलं?

Sillod News : पोळ्याच्या दिवशी काळाचा घाला; भराडीच्या १५ वर्षीय विद्यार्थ्याचा तळ्यात बुडून मृत्यू

Marathi News Live Updates : ...तर गरबा उत्सवात सनातनी मुस्लिमांचे स्वागत करण्यास आपण तयार; अमोल ठाकरे यांची माहिती

SCROLL FOR NEXT