नाशिक

बँकेच्या पाच दिवसाचा आठवडा करावा : राहुल सूर्यवंशी..

CD
फोटो : 15865 मालेगाव : संपात सहभागी बँकेचे कर्मचारी. ------- बँकेचा पाच दिवसांचा आठवडा करावा : सूर्यवंशी सकाळ वृत्तसेवा मालेगाव, ता. ११ : राष्ट्रीयीकृत बँकेमध्ये पाच दिवसांचा आठवडा करावा, या मागणीसाठी राज्यभर युनायटेड फोरम व ऑफ बँक युनियनतर्फे विविध मागण्यांसाठी शुक्रवारी (ता. ११) एकदिवसीय बंद पुकारण्यात आला होता. मालेगाव येथे युनियनचे अध्यक्ष राहुल सूर्यवंशी व भारतीय स्टेट बँकेचे प्रवीण ठोके यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास २८ ते ३० सप्टेंबरपर्यंत देशव्यापी संप पुकारणार असल्याचे त्यांनी सांगितले. शहर व तालुक्यातील राष्ट्रीयीकृत बँकेची पदाधिकारी संपात सहभागी झाले होते. संपात भारतीय स्टेट बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा यांसह शहर तालुक्यातील चारशे कर्मचारी सहभागी झाले होते. शहर व तालुक्यातील ५० शाखांतील कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. कर्मचाऱ्यांच्या मागण्या अशा : बँक कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा करावा, परफॉर्मन्स लिंक इन्सेंटिव्हची अंमलबजावणी करावी, प्रलंबित मागण्या मान्य कराव्यात. महाराष्ट्र बँकेचे राहुल सूर्यवंशी, दीपक सोनजे, मंदार खर्डे, संदीप शेलार, सतीश अहिरे, दीपक शिंदे, स्टेट बँकेचे प्रवीण ठोके, सोनूसिंग गिरासे, योगेश गवळी, बँक ऑफ बडोदाचे दीपक गौराणे, अनिकेत डोंगरे, संदीप बच्छाव, प्रियांका दाने, विपरा राजे, अंकिता पारख आदी उपस्थित होते. ---- बँक बंदमुळे नागरिकांचे हाल संपामुळे शहर व परिसरात राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये नागरिकांचे हाल झाले. यामध्ये पैसे काढणे, पैसे भरणे, केवायसी करणे, एनईएफटी, आरटीजीएस, शासकीय व्यवहार, चेक क्लिअरिंग आदी समस्यांचा सामना करावा लागला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaugcha Raja First Look 2026 : प्रतीक्षा संपली! लालबागच्या राजाचा पहिला लूक समोर; बाप्पाचं मनमोहक रूप पाहून भाविक भारावले, पाहा खास फोटो

BRICS Summit 2026 : पीएम मोदींनी पुतिन यांना भेट दिलेला 'तिरुक्कुरल' ग्रंथ काय आहे? जाणून घ्या संत तिरुवल्लुवर यांचा इतिहास

VIRAT KOHLI :लंडनमध्ये विराट कोहली अन् एकनाथ शिंदेंची खास भेट; विकासकामांपासून युवा टॅलेंटपर्यंत झाली चर्चा, नेमकं काय बोलणं झालं?

BRICS Summit Food: सत्तू, मखाना अन् काश्मिरी पदार्थ... ब्रिक्स परिषदेतले शाही मेन्यू कोणते? नॉनव्हेज आहे का?

Latest Marathi News Live Update : शिंदेसेनेच्या आमदाराच्या मुलाला अटक, कारण काय?

SCROLL FOR NEXT