नाशिक

बिबट्याच्या बंदोबस्तासाठी शेतकऱ्यांसह ग्रामस्थांचा पुढाकार

CD
फोटो -15868 रावळगाव : सुरक्षिततेसाठी स्वत:च्या वाहनाने वन विभागाच्या कार्यालयातून पिंजरा आणणारे शेतकरी. ---- बिबट्याला पकडण्यासाठी शेतकऱ्यांनीच आणला पिंजरा सकाळ वृत्तसेवा मालेगाव, ता. ११ : रावळगाव सेक्शन बी परिसरात आठवड्यापासून चार ते पाच बिबटे ठिकठिकाणी आढळले आहेत. बिबट्यांनी आतापर्यंत गायी, म्हशी, कुत्रे आदी जनावरांना ठार केले आहे. त्यामुळे परिसरात शेतमळ्यांमध्ये राहणाऱ्या नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वन विभागाचे अधिकारी या भागात येऊन गेले. मात्र त्यांनी पिंजरा लावला नाही. अखेर शेतकरी व ग्रामस्थांनी पुढाकार घेत वन विभागाच्या कार्यालयातून शेतकऱ्यांनी स्वत:च्या ट्रॅक्टरमधून पिंजरा आणून ताे परिसरात लावला. रावळगाव सेक्शन बी परिसरात काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकरी व ग्रामस्थ भयभीत आहेत. वन विभागाचे अधिकारी या भागात आले. बिबट्याने ठार केलेल्या जनावरांचा पंचनामा केला. मात्र त्यांनी पिंजरा लावला नाही. पिंजरा आणायला आमच्याकडे वाहन नाही, अशा स्वरूपाची उत्तरे दिल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी तर फोनही उचलत नाहीत अशा या भागातील शेतकरी व ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत. सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेऊन सेक्शन बी येथील दिलीप जाधव, गोकुळ पवार, आनंद पवार, भास्कर पवार, नारायण पवार, दीपक पवार, संजय पवार, संदीप खैरनार आदी शेतकऱ्यांनी पुढाकार घेत मालेगाव येथून स्वत:च्या वाहनाने पिंजरा आणला. तो या भागात लावण्यात आला. रात्री पिकांना पाणी देण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांना बिबट्याच्या वावरामुळे भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे बिबट्याला पकडण्यासाठी ग्रामस्थांना स्वतः पुढाकार घेऊन पिंजऱ्याची व्यवस्था करावी लागली. वन विभागाने बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून त्याला जेरबंद करावे. तसेच या भागात किमान एक पिंजरा लावावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. स्वत:च्या सुरक्षिततेसाठी ग्रामस्थांनी उचललेल्या पावलाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaugcha Raja First Look 2026 : ही शान कुणाची...! लालबागच्या राजाची पहिली झलक समोर; भव्य मंदिरसदृश प्रवेशद्वार अन् महाकाय त्रिशूळाची चर्चा, पाहा खास Photo

काय राव, सगळ्या DRSचं क्रेडिट तू घेतलंस! ईशान किशन किशनने वैभवला चिडवलं; १५ वर्षांच्या पठ्ठ्यानेही लगेच दिलं भन्नाट उत्तर, नेमकं काय घडलं?

VIRAT KOHLI :लंडनमध्ये विराट कोहली अन् एकनाथ शिंदेंची खास भेट; विकासकामांपासून युवा टॅलेंटपर्यंत झाली चर्चा, नेमकं काय बोलणं झालं?

Latest Marathi News Live Update : मविआचं सरकार पाडण्यासाठी ५ हजार कोटी खर्च, ठाकरेंच्या खासदाराचा गंभीर आरोप

BRICS Summit 2026 : पीएम मोदींनी पुतिन यांना भेट दिलेला 'तिरुक्कुरल' ग्रंथ काय आहे? जाणून घ्या संत तिरुवल्लुवर यांचा इतिहास

SCROLL FOR NEXT