फोटो - 15876, 15877
मालेगावला गणेशमूर्ती
कार्यशाळांना प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
दाभाडी, ता. १३ : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रोकडोबानगर येथे विद्यार्थ्यांसाठी मातीपासून गणपती बनवण्याची कार्यशाळा उत्साहात घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेत मातीपासून आकर्षक गणेशमूर्ती तयार केल्या. या कार्यशाळेदरम्यान विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे महत्त्व सांगण्यात आले. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींऐवजी मातीच्या मूर्तींचा वापर करणे, जलप्रदूषण टाळणे तसेच पर्यावरणाचे संरक्षण करणे याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मुख्याध्यापक मंगला दातारे यांनी केले.‘मातीपासून गणपती बनवूया आणि पर्यावरणाचे रक्षण करूया’ असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. मुख्याध्यापिका मंगला दातरे, प्रतिभा पाटील, निलेश नहिरे, सुशिला पवार तसेच मदतनीस जिजाबाई अहिरे उपस्थित होते.
सर्वोदय विद्यालयात कार्यशाळा
मालेगाव : येथील सर्वोदय प्राथमिक विद्यालयात शाडू मातीपासून इको-फ्रेंडली गणपती बनविण्याच्या कार्यशाळा झाली. मूर्तिकार श्याम शिंपी यांनी विद्यार्थ्यांना शाडू माती म्हणजे काय, ती पर्यावरणासाठी कशी चांगली आहे आणि त्या मातीपासून सुबक गणेशमूर्ती कशी बनवायची याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. शाडू माती पाण्यात लवकर विरघळते आणि नदी-नाल्याचे प्रदूषण होत नाही, हा संदेश त्यांनी मुलांना दिला. मुख्याध्यापिका ला. का. बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम घेण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.