फाेटो -15882
कळवाडी : आदीवासी मेळाव्यात बोलतांना पालकमंत्री गिरीष महाजन, समवेत माजी केंद्रीय मंत्री भारती पवार, आमदार मंगेश चव्हाण, भाजपा नेते सुनील गायकवाड आदी.
----
वीर एकलव्य यांचे शौर्य प्रेरणादायी
महाजन ः कळवाडीत आदिवासी समाजाचा मेळावा
सकाळ वृत्तसेवा
मालेगाव, ता. १३ : भगवान वीर एकलव्य यांचे शौर्य, समर्पण व ध्येयनिष्ठा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. आदिवासी समाजाच्या विकासासाठी शासन स्तरावर समाजाची संस्कृती, परंपरा, कला व वारसा जतन करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे प्रतिपादन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले.
कळवाडी (ता. मालेगाव) येथे भगवान वीर एकलव्य यांच्या प्रतिमापूजनानंतर झालेल्या आदिवासी समाजाच्या मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा डॉ. भारती पवार होत्या. आमदार मंगेश चव्हाण, एकलव्य संघटनेचे प्रदेशाध्यक्ष पवनराजे सोनवणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. भगवान वीर एकलव्य यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. विविध वेशभूषांमधून पौराणिक व आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. आयोजक भाजप नेते सुनील गायकवाड यांनी स्वागत केले. यावेळी भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व आदिवासी समाजबांधव उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.