फोटो -15883
चंदनपुरी : अविष्कार संशोधन स्पर्धेबाबत मार्गदर्शन करतांना डॉ. इमरान शेख
-----
चंदनपुरी महाविद्यालयात
‘अविष्कार’ स्पर्धेबाबत मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
मालेगाव, ता. १३ : चंदनपुरी (ता. मालेगाव) येथील आप्पासाहेब बुवाजी पाटील वरिष्ठ महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या ‘अविष्कार’ संशोधनात्मक स्पर्धेबाबत मार्गदर्शन कार्यशाळा झाली.
विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची वृत्ती विकसित होऊन त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांना चालना मिळावी, या उद्देशाने होणाऱ्या कार्यशाळेत डॉ. इमरान शेख यांनी संशोधन विषयाची निवड, नाविन्यपूर्ण संकल्पना, संशोधनाची दिशा, प्रकल्पाची मांडणी तसेच ‘अविष्कार’ स्पर्धेतील आवश्यक बाबींविषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी परिसरातील समस्या व गरजा ओळखून संशोधन व नाविन्यपूर्ण प्रयोगांतून उपाय शोधण्याचे आवाहन करीत विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.
संस्थेचे अध्यक्ष सतीश पाटील यांनी विद्यार्थ्यांनी केवळ पदवीपुरते शिक्षण न घेता ज्ञानाचा उपयोग समाजातील समस्या सोडविण्यासाठी करावा, असे आवाहन केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये संशोधनात्मक दृष्टिकोन व कृतीशीलता वाढावी, यासाठी महाविद्यालयात विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांना प्रोत्साहन दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले.समन्वयक तेजस पाटील, बी. आर. पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक चंद्रशेखर शेलार, प्राचार्य प्रा. सुरेश खैरनार, प्रा. ठाकरे, प्रा. आफिया नाझ, नरेंद्र घरटे, प्रा. विशाल बच्छाव, प्रशांत पाकळे, प्रा. नितीन अहिरे, दीपेश शेलार, वैभव शेलार आदी उपस्थित होते. समन्वयक प्रा. एस. एस. शेलार यांनी प्रास्ताविक केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.