नाशिक

शहरातून होणाऱ्या अवजड वाहनांच्या वाहतुकीबाबत अहवाल सादर करण्याचे आदेश

CD
अवजड वाहनांच्या वाहतुकीचा अहवाल सादर करण्याचे आदेश सकाळ वृत्तसेवा मालेगाव, ता. १३ : कुसुंबा-मालेगाव रस्ता शहरातील द्याने-रमजानपुरा या दाट लोकवस्तीच्या भागातून जातो. या मार्गावर कमी टोल लागत असल्याने अवजड वाहनांची वर्दळ वाढली आहे. गेल्या आठवड्यात या रस्त्यावर झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी आंदोलन केले. अवजड वाहनांना शहरातून प्रवेश नाकारावा, अशी मागणी सामाजिक संघटनांसह इस्लाम पक्षाने केली आहे. अपघातांची संख्या व नागरिकांच्या भावना लक्षात घेता निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत यांनी कुसुंबा-मालेगाव मार्गावरील अवजड वाहनांच्या वाहतुकीबाबत तातडीने पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश प्रांताधिकारी, तहसीलदार व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना दिले आहेत. कुसुंबा-मालेगाव हा मार्ग डोंगराळे, टिंगरी, दहिदी, करंजगव्हाण, वडगाव, द्यानेमार्गे रमजानपुरा, आयशानगर, नवीन बसस्थानक व मोसम पुलाच्या दाट लोकवस्तीमधून जातो. रस्त्याचे काँक्रिटीकरण झाल्याने वाहतुकीसाठी हा मार्ग सोयीचा झाला आहे. गुजरातकडून येणाऱ्या वाहनांना साक्री-धुळे-मालेगाव मार्गावर अधिक टोल लागत असल्याने साक्री-कुसुंबा-मालेगाव या सुमारे ३० किलोमीटरच्या मार्गाचा वापर वाढला आहे. अवजड वाहनांची वाहतूक दाट लोकवस्तीतून होत असल्याने अपघातांचा धोका वाढला आहे. दरम्यान, कुसुंबाकडून येणारी अवजड वाहनांची वाहतूक करंजगव्हाणहून झोडगे मार्गे महामार्गावर वळविण्याची शक्यताही व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रज्वल रेवन्नाचा आणखी एक कारनामा; तुरुंगात जप्त केलेल्या मोबाइलमध्ये सापडले १४५ हून अधिक अश्लील व्हिडीओ

IND vs WI: ऋतुराज गायकवाड, रिषभ पंत, जडेजाचे पुनरागमन होणार? वेस्ट इंडिजविरुद्धच्या ODI मालिकेसाठी का होणार संघात बदल

हरतालिकेची पूजा का करतात? एका क्लिकमध्ये वाचा व्रताचे महत्त्व!

'मी जे केलं ते तुम्ही करू नका...' सिंगल मदरहुडबद्दल नीना गुप्तांचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाल्या...

Marathi News Live Updates : डल्लुपुरा येथील धर्मशिला हॉस्पिटलजवळील गोदामाला आग

SCROLL FOR NEXT