नाशिक

माहितीचा अधिकार दिनानिमित्त जनजागृतीपर उपक्रम राबवावेत : तहसीलदार सोनवणे

CD
माहितीचा अधिकार दिनानिमित्त उपक्रम राबवावेत : तहसीलदार सोनवणे सकाळ वृत्तसेवा मालेगाव, ता. १७ : नागरिकांना शासकीय कामकाजातील पारदर्शकता, उत्तरदायित्व तसेच प्रशासनातील माहिती मिळविण्याचा कायदेशीर अधिकार याबाबत व्यापक जनजागृती व्हावी, यासाठी २८ सप्टेंबरला माहितीचा अधिकार दिन मालेगाव तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये विविध उपक्रमांनी साजरा करण्यात यावा, असे आवाहन मालेगाव, तहसीलदार विशाल सोनवणे यांनी पत्रकान्वये केले आहे. केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ बाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासोबतच अधिकारी व कर्मचाऱ्यांना कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत अधिक संवेदनशील करण्याच्या उद्देशाने माहितीचा अधिकार दिन साजरा करण्यात येणार आहे. मालेगाव तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये माहितीचा अधिकार अधिनियम २००५ बाबत जनजागृती कार्यक्रम आयोजित करणे, अधिकारी व कर्मचाऱ्यांना कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत मार्गदर्शन करणे, नागरिकांना माहितीचा अधिकार अर्ज करण्याची प्रक्रिया व त्यांच्या अधिकारांबाबत माहिती देणे, तसेच कार्यालयांच्या दर्शनी भागात माहितीचा अधिकारासंबंधी आवश्यक माहिती व जनजागृतीपर फलक लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. माहितीचा अधिकार दिनानिमित्त अधिनस्त शासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच अधिपत्याखालील कार्यालयांमध्ये कार्यक्रम साजरा करण्यासाठी कार्यालयीन स्तरावर आवश्यक परिपत्रक व सूचना निर्गमित करून संबंधित विभाग व कार्यालयांना वेळेत माहिती देऊन आवश्यक कार्यवाही करावी. तसेच, माहितीचा अधिकार दिनाच्या जनजागृतीसाठी प्रसिद्ध करण्यात येणारी माहिती ग्रामपंचायत कार्यालयाच्या दर्शनी भागात लावून प्रसिद्धी देण्याच्या सूचना तहसीलदार श्री.सोनवणे यांनी दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Bushra Bano IPS? : 'अस्सलाम-अलैकुम' म्हटल्यामुळे IPS अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली? बंगालमधील 'त्या' व्हिडिओवरून गदारोळ

Fact Check : विराट कोहली २०२७ चा वन डे वर्ल्ड कप इंग्लंडसाठी खेळणार? भारतीय क्रिकेटला हादरवून टाकणाऱ्या वृत्तामागचे सत्य

Tata News: चंद्रशेखरन यांचा U-Turn? पुन्हा Tata चेअरमनपदी निवड! निर्णय होताच शेअर्स 5% वाढले; नेमकं काय घडलं?

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या टीमवर दुःखाचा डोंगर; लेखकाचं अकस्मात निधन, सचिन गोस्वामींची भावुक श्रद्धांजली

UPI MDR 2026 : अमेरिकेच्या दबावामुळे युपीआय वर एमडीआर? केंद्र सरकारने दिले स्पष्टीकरण; जाणून घ्या नेमकं प्रकरण

SCROLL FOR NEXT