नाशिक

मालेगाव तालुक्यातील वाके जवळ दरोडा चौघांकडुन मारहाण

CD
पान-३ मेन फाेटो- १५९०५ नांदगाव बुद्रुक ः जखमी निर्मला सोनवणे ------------ नांदगाव बुद्रुक येथे दरोडा चौघांकडून तिघांना मारहाण; साडेतीन लाखांचा मुद्देमाल लंपास सकाळ वृत्तसेवा मालेगाव, ता. १६ : मालेगाव तालुक्यातील वाके रस्त्यावरील नांदगाव बुद्रुक येथे चौघा भामट्यांनी दरोडा टाकत घरातील साडेतीन लाखांचा मुद्देमाल लांबविला. या प्रकरणी चाैघांनी वखरण्याची लाेखंडी पासने तिघांना मारहाण करून त्यांच्या आंगावरील सोने लंपास केले. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेमुळे वाकेसह परिसरात खळबळ उडाली आहे. नांदगाव बुद्रुक (ता.मालेगाव) येथे प्रकाश गंगाधर सोनवणे (वय ५२) घरात झोपलेले असताना ३० ते ४० वयोगटातील चार अनोळखींनी त्याच्या घरात जबरदस्तीने घुसुन प्रकाश यांच्या आई राजूबाई गंगाधर सोनवणे (वय ७५) व प्रकाश यांच्या पत्नी निर्मला सोनवणे यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चैन, टोंगल, मंगलसूत्र, डोरले जबरदस्तीने काढले. या वेळी महिलांनी विरोध केल्यावर दरोडेखाेरांना तिघांना शेतात वखरणी करणाऱ्या लोखंडी पासने डोक्यावर, हातावर मारहाण करुन जखमी केले. तसेच घरात शिरून सोनवणे यांच्या कपाटातील ८५ हजारांची रोकड, घरातील चार मोबाईल असा तीन लाख ३७ हजारांचा मुद्देमाल हिसकावून पळ काढला. त्यांना मालेगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मंगळवारी मध्यरात्री हा प्रकार घडला. घटनेची माहिती समजताच पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप स्वामी, अप्पर पाेलिस अधीक्षक सूरज गुंजाळ, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राहुल मोरे, रघुनाथ शेगर, प्रीती सांवजी, तुषार भदाणे यांनी पाहणी करून पंचनामा केला. या प्रकरणी तालुका पोलिसांत गुन्हा दाखल झाला. तालुका पलिसांचा त्या अनुषांने तपास सुरू आहे. ------------- चौकट परराज्यातील सराईत गुन्हेगार दरोडा टाकणारी टोळी आपसांत परराज्यातील भाषा बोलत होते. त्यामुळे सोनवणे व परिवाराला त्यांची भाषा समजत नव्हती. या भागात मोठ्या प्रमाणात मळे आहेत. या मळ्यांत नागरिक राहतात. सोनवणे यांच्याकडेच का दरोडा पडला, याची पार्श्वभूमी तपासली जात आहे. कसमादे भागात मोठ्या प्रमाणात कांदे, मका लावणी व काढणीसाठी परराज्यातील मजूर येतात. सोनवणे यांचे मजुरांसोबत भांडण तर झाले नव्हते ना, त्याचा बदला घेतला असावा, अशी चर्चा सुरू आहे. या दरोड्यात पाच ते सहा जण असल्याचा संशय आहे. यासंदर्भात तालुका पोलिसांनी महामार्गावरील तसेच वाके व नांदगाव बुद्रुक परिसरातील सीसीटीव्ही तपासले आहेत. त्या अनुषंगाने तपास सुरू आहे. यातील सर्व संंशयित सराईत असल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : कळंबा कारागृहात दंगा- आरडाओरड करण्यास मनाई केल्याने अधिकाऱ्याला मारहाण

Manoj Jarange Patil: मोठी बातमी! हैदराबाद गॅझेटियरमध्ये नावंसुद्धा सापडली; विखे पाटलांसह शिष्टमंडळ हैदराबादला जाणार?

Vidyadhar Anaskar : राज्य सहकारी बँकेचे ५,७४५ कोटींचे विक्रमी नेटवर्थ; ठेवी कमी करण्याचा निर्णय व्यावसायिक गणितातून

पाकिस्तानचं नवीन नाटक! PCB नंतर आता हॉकी संघाने भारतात येण्यास दिला नकार; म्हणतात, आमच्या खेळाडूंना सुरक्षित वातावरण हवंय...

CM Devendra Fadnavis : मनोज जरांगे पाटील यांच्या १३ पैकी १२ मागण्या मान्य! आंदोलन करून गणेशोत्सवावर ताण आणू नका; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

SCROLL FOR NEXT