नाशिक

घात - अपघात

CD
घात-अपघात मोबाईलची परस्पर विक्री मालेगाव ः येथील जुना आग्रा रस्त्यावरील हिंगलाजनगर भागात पुजारा टेलिकॉम प्रा. लि. कंपनीशी अलमन मोहम्मद अन्वर (रा. गुलेशने मालिक) याने करार केला. मालेगाव येथे मोबाईल व इतर इलेक्ट्रिक साहित्य विक्रीचे स्टोअर सरू केले. पुजारा टेलिकॉमकडून अलमनला नवीन माेबाईल देण्यात आले. अलमनने कंपनीच्या करारानुसार विक्री न करता परस्पर २७ लाख ९५ हजार ३५३ रुपयाचा माल विक्री केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. कंपनीचे व्यवस्थापक तुषार पंढरीनाथ महाजन यांच्या तक्रारीवरून आयेशानगर पोलिसांत गुन्हा दाखल झाला. ----- वृद्धाची आत्महत्या येथील अयोध्यानगरातील श्रीराम चौकी येथे राहणाऱ्या युवराज उत्तमसिंग परदेशी (वय ६३) यांनी त्यांच्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांना नितीन परदेशी यांनी सामान्य रुग्णालयात दाखल केले. डॉ. ओम जाधव यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. छावणी पाेलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली. ----- ५८ हजारांचे साहित्य चोरी चिखलओहोळ (ता. मालेगाव) शिवारातील बापू रामदास सोनवणे यांच्या शेतातील मोटार, वायर असा ५८ हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबविला. तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. ----- तिघांविरुद्ध गुन्हा येथील हाफिजुर्रहेमान अब्दुलरहेमान पठाण, मोहम्मद ताबीर अख्लाक अहमद, इफ्तेकार अहमद यांनी वीजमीटरमध्ये छेडछाड केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तालुका पोलिस ठाण्यात कार्यकारी अभियंता तन्मय वाघ यांच्या तक्रारीवरून तालुका पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : कळंबा कारागृहात दंगा- आरडाओरड करण्यास मनाई केल्याने अधिकाऱ्याला मारहाण

Manoj Jarange Patil: मोठी बातमी! हैदराबाद गॅझेटियरमध्ये नावंसुद्धा सापडली; विखे पाटलांसह शिष्टमंडळ हैदराबादला जाणार?

Vidyadhar Anaskar : राज्य सहकारी बँकेचे ५,७४५ कोटींचे विक्रमी नेटवर्थ; ठेवी कमी करण्याचा निर्णय व्यावसायिक गणितातून

पाकिस्तानचं नवीन नाटक! PCB नंतर आता हॉकी संघाने भारतात येण्यास दिला नकार; म्हणतात, आमच्या खेळाडूंना सुरक्षित वातावरण हवंय...

CM Devendra Fadnavis : मनोज जरांगे पाटील यांच्या १३ पैकी १२ मागण्या मान्य! आंदोलन करून गणेशोत्सवावर ताण आणू नका; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

SCROLL FOR NEXT