नाशिक

टीपू सुल्तान प्रतिमा प्रकरणी उच्च न्यायालयात प्रतिदावा दाखल करणार

CD
टीपू सुलतान प्रतिमा प्रकरणी न्यायालयात प्रतिदावा विहिंपचे शहरमंत्री श्याम देवरे यांची माहिती सकाळ वृत्तसेवा मालेगाव, ता. २० : महापालिकेच्या उपमहापौर शान-ए-हिंद निहाल अहमद यांच्या दालनात टीपू सुलतान यांची प्रतिमा लावल्यावर निर्माण झालेला वाद आता न्यायालयात पोहोचला आहे. प्रतिमा हटविण्याच्या कारवाईविरोधात उपमहापौरांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर राज्य शासनाला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान, या प्रकरणात ॲड. साई अक्कर यांच्या माध्यमातून उच्च न्यायालयात प्रतिदावा दाखल करणार असल्याची माहिती विश्व हिंदू परिषदेचे शहरमंत्री श्याम देवरे यांनी दिली. उपमहापौरांच्या दालनात टीपू सुलतान यांची प्रतिमा लावल्यानंतर देवरे यांनी आक्षेप घेत धरणे आंदोलन केले होते. त्यानंतर ३१ ऑगस्टला नगरविकास विभागाने प्रतिमा हटविल्याचे पत्र देवरे यांना दिले होते. उपमहापौरांच्या याचिकेत आपल्याला पक्षकार करण्यात आलेले नाही. त्यामुळे कायदेशीर हस्तक्षेप करण्याचा निर्णय घेतल्याचे देवरे यांनी सांगितले. शासनाच्या २००२ आणि १५ सप्टेंबर १९६५च्या परिपत्रकांत सार्वजनिक कार्यालयांत लावण्यात येणाऱ्या २४ राष्ट्रीय नेत्यांच्या प्रतिमांची यादी असल्याचा दावा त्यांनी केला. या यादीत टीपू सुलतान यांचे नाव नसल्याने महापालिका कार्यालयात त्यांची प्रतिमा लावू नये, अशी भूमिका घेत प्रतिदावा दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, उपमहापौरांच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकार व संबंधित प्राधिकरणांना आपली भूमिका प्रतिज्ञापत्राद्वारे मांडण्यास सांगितले आहे. त्यामुळे या प्रकरणातील पुढील सुनावणीकडे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Flight Chaos: अमेरिकेत एकाच वेळी सर्व विमानांची उड्डाणे थांबवली! 9/11 नंतर पहिल्यांदाच अशी घटना? नेमकं काय घडलं?

Tiger Attack: वाघाने चिमुरड्याला जबड्यात पकडून नेले, बहीण वाचली, पाळण्यातला भाऊ दगावला; भंडाऱ्याच्या तिर्रीची घटना

Gokul Milk Price Hike : 'गोकुळ'कडून तूर्तास दूध दरवाढीचा निर्णय नाही; नूतन अध्यक्ष राजेश पाटील यांनी स्पष्ट केली भूमिका, मुख्यमंत्र्यांसह दूध विक्रेत्यांशी साधणार संवाद

Latest Marathi News Live Update: ‘गोकुळ’ची सर्वसाधारण सभाही गाजणार

Children's Day 2026 Wishes in Marathi: लहानपण देगा देवा! बालदिनानिमित्त शेअर करा बालपणाच्या आठवणी जागवणारे खास संदेश

SCROLL FOR NEXT