नितीन ठाकरे : MSI26B09123
-------------------
काळगावच्या ठाकरे यांना शेतीनिष्ठ पुरस्कार जाहीर
म्हसदी, ता. २४ : काळगाव (ता. साक्री) येथील फळबागातदार युवा शेतकरी नितीन जयवंतराव ठाकरे यांना नाशिक विभागीय सर्वसाधारण गटासाठी वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार जाहीर झाला आहे. रोख रक्कम, स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
मुंबई (वरळी) येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम (नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया- डोम) मध्ये १ जुलैस दुपारी एकला राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे उपस्थित असतील. शासनाच्या कृषी विभागातर्फे नाविन्यपूर्ण आणि प्रगतशील शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. हा पुरस्कार शेती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आणि इतरांना प्रेरणा देणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव करण्यासाठी दिला जातो. नितीन ठाकरे यांनी पारंपरिकऐवजी शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत डाळिंब, सीताफळाची फळबाग व शेवगा लागवड करत सेंद्रिय भाजीपाला शेतीत क्रांती केली आहे. त्यांनी कमी पाण्यात ठिबक सिंचनाद्वारे शेती फुलवली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.