MSI26B09125
साक्री : सी. गो. पाटील महाविद्यालयात योगासने करताना विद्यार्थी व शिक्षक.
--------------
पाटील महाविद्यालयात
योग दिन उत्साहात
म्हसदी : साक्री येथील विद्या विकास मंडळाच्या सीताराम गोविंद पाटील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात योग दिन साजरा करण्यात आला. प्राचार्य डॉ. अनंत पाटील, माजी प्राचार्य डॉ. राजेंद्र अहिरे उपस्थित होते. रसायनशास्त्र विभागाचे डॉ. प्रीतम तोरवणे यांनी प्राणायाम व योग आसनाचे प्रशिक्षण दिले. राष्ट्रीय छात्र सेनेचे लेफ्टनंट डॉ. भूषण अहिरराव, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. सुरेंद्रसिंग मगर, शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागाचे संचालक डॉ. हसीनखा तडवी, रासेयो महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. ज्योती वाकोडे, सहायक अधिकारी प्रा. राजू देवकर यांनी परिश्रम घेतले.