MSI26B09129
मालपूर : आईच्या निधनानंतर पंचक्रिया विधीत आप्तेष्टांना रोपटे देताना अशोक सोनवणे.
----------------
पंचक्रिया विधीत रोपांचे वाटप
मालपूरच्या सोनवणे कुटुंबीयांचा पर्यावरणपूरक उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
म्हसदी, ता. २५ : मालपूर (ता. साक्री) येथील सोनवणे परिवाराने मातृनिधनाचे दुःख बाजूला सारून पारंपरिक अनावश्यक कर्मकांडाना फाटा दिला. नदीचे प्रदुषण रोखण्यासाठी त्यांनी अस्थींचे विसर्जन न करता त्या अस्थी व अंत्यसंस्काराची राख (रक्षा) स्वतःच्या शेतात खत म्हणून वापरण्याचा निर्णय घेत घेतला.
रखमाबाई पंडितराव सोनवणे (वय ९४) यांचे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले. त्यांच्या पश्चात पाचव्या दिवशी होणारा गंधमुक्ती व पंचक्रिया विधी अगदी साध्या पद्धतीने करण्याचे त्यांच्या कुटुंबाने ठरवले. नदीचे वाढते प्रदुषण रोखण्यासाठी त्यांच्या अस्थींचे विसर्जन नदीपात्रात न करता त्या अस्थी आणि अंत्यसंस्काराची राख (रक्षा) स्वतःच्या शेतात खत म्हणून वापरण्याचा स्तुत्य निर्णय घेतला. तसेच, अमरधाममध्ये अंत्यसंस्कारासाठी लाकडांऐवजी केवळ गोवऱ्यांचा वापर करीत वृक्षतोडीला आळा घातला. दिवंगत रखमाबाई पंडितराव सोनवणे यांचे सुपुत्र प्रगतिशील शेतकरी अशोक सोनवणे, भास्कर सोनवणे, सुनील सोनवणे व कन्या मीनाताई पवार (पिंपळनेर) यांनी या दुःखद प्रसंगाचे रुपांतर निसर्ग सेवेत करत आप्तेष्ट,ना तेवाईक व मित्रपरिवाराला रोपांचे वाटप केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.