नाशिक

शिक्षक दिनानिमित्त विटाईत जेष्ठ शिक्षकांचा सत्कार

CD
MSI26B09501 विटाई : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत ज्येष्ठ शिक्षकांचा सत्कार करताना शिक्षक. --------------------- विटाई शाळेत गुरुवंदना माजी शिक्षकांचा सत्कार म्हसदी, ता. ६ : विटाई (ता. साक्री) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे शिक्षक दिनाचे औचित्य साधून गावात सेवा दिलेल्या माजी शिक्षकांचा सत्कार करत त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. याप्रसंगी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन शिक्षकांच्या हस्ते करण्यात आले. शाळेत तब्बल २४ वर्षे सेवा बजावणारे निवृत्त पदोन्नती मुख्याध्यापक दत्तात्रय शंकर पाटील (वय ८३) आणि ११ वर्षे सेवा केलेले शिक्षक आप्पाजी सुकदेव खैरनार (वय ८९) यांचा सन्मान करण्यात आला. दोन्ही जेष्ठ गुरुजनांच्या आठवणीसाठी शाळा परिसरात जांभळाचे रोप लावून वृक्षारोपण करण्यात आले. अध्यापनातून घडलेल्या पिढ्यांचा अभिमान व्यक्त करत ज्ञानदानाच्या पवित्र कार्यात झोकून दिल्यामुळेच आज कृतार्थ जीवन जगत असल्याचे भावना सत्काराला उत्तर देताना जेष्ठ शिक्षकांनी व्यक्त केल्या. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश खैरनार अध्यक्षस्थानी होते. सदस्य संजय कुवर, मुख्याध्यापक अरुण खैरनार, उपशिक्षिका सुरेखा देसले यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. उपशिक्षिका सुरेखा देसले यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav Raj Thackeray : गणेशोत्सवात दंगलींचा कट? ‘मुंबईत झलक दिसली’; राज ठाकरेंचा खळबळजनक इशारा

Vaibhav Sooryavanshi ची फटकेबाजी पाहून तिलक वर्मा वैतागला; १५ वर्षाच्या पोराला उगाच भिडला, अम्पायरची पळापळ... Video

Pune Bengaluru Highway: कारला आग लागली अन् महामार्ग ठप्प; आनेवाडीजवळ ५ किमी वाहनांच्या रांगा, अग्निशामक वाहनावर संताप

Marathi News Live Updates : चिंचवड सब स्टेशन इथं ट्रान्सफर्मरला आग, चिंचवडगाव, वाल्हेकरवाडीसह रावेतमध्ये विजपुरवठा खंडित

वयाच्या १५व्या वर्षी आई, १७व्या वर्षी वडील गेले... दोनदा बारावीची परीक्षा दिलेल्या पूजाने KBC मध्ये जिंकले १२.५ लाख, अमिताभही अवाक्

SCROLL FOR NEXT