नाशिक

आॅक्टोबर महिन्यात म्हसदीत मराठा सामाजिक परिषदेचा महिला मेळावा

CD
MSI26B09508 म्हसदी : ग्रामपंचायतीच्या कार्यालयात मराठा सामाजिक परिषदेच्या बैठकीस उपस्थित समितीचे पदाधिकारी व ग्रामस्थ. ------------------ म्हसदीत ऑक्टोबरमध्ये महिला मेळावा मराठा सामाजिक परिषदेकडून अनिष्ट प्रथा, अंधश्रद्धा व रूढी-परंपरांविरोधात जागृती सकाळ वृत्तसेवा म्हसदी, ता. ५ : ग्रामीण भागातील महिलांमध्ये सामाजिक प्रश्नांविषयी जनजागृती करून विवेकी विचारांची रुजवात करण्याच्या उद्देशाने साक्री तालुका मराठा सामाजिक परिषदेच्या वतीने ऑक्टोबर महिन्यात म्हसदी येथे महिला मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. या मेळाव्याच्या पूर्वतयारीसाठी ग्रामपंचायत कार्यालयात नुकतीच बैठक झाली. स्थानिक लोकप्रतिनिधी, धनदाईदेवी तरुण ऐक्य मंडळाचे पदाधिकारी तसेच ग्रामस्थांनी मेळावा यशस्वी करण्यासाठी सहकार्य करण्याची तयारी दर्शविली. धनदाईदेवी तरुण ऐक्य मंडळाचे उपाध्यक्ष गंगाराम देवरे अध्यक्षस्थानी होते. या वेळी मराठा सामाजिक परिषदेचे अध्यक्ष नामदेव देसले, उपाध्यक्षा संजीवनी गांगुर्डे-पाटील, धनदाईदेवी तरुण ऐक्य मंडळाचे अध्यक्ष यशवंतराव देवरे, सचिव हिम्मतराव देवरे, ज्येष्ठ संचालक रघुनाथ देवरे, के. एन. देवरे, सुभाष देवरे, महेंद्र देवरे, निवृत्त विभाग नियंत्रक राजेंद्र देवरे, उपसरपंच चंद्रकांत देवरे, पंचायत समिती सदस्य राजधर देसले, ॲड. नरेंद्र मराठे, शोभना पाटील, शुभांगी देवरे, मधुकर गांगुर्डे, भगवंत देवरे, शिवाजी देवरे, प्रकाश देवरे, देवेंद्र देवरे, विलास देसले, रामराव ह्याळीस, राज देवरे, अनिल देवरे, किरण देवरे आदी उपस्थित होते. महिलांच्या प्रबोधनावर भर मराठा सामाजिक परिषदेच्या शताब्दी वर्षानिमित्त फेब्रुवारीमध्ये छाईल (ता. साक्री) येथे अधिवेशन झाले होते. शंभर वर्षांपूर्वी समाजधुरिणांनी मांडलेल्या सामाजिक सुधारणांच्या ठरावांतील अनेक प्रश्न आजही कायम असल्याची खंत बैठकीत व्यक्त करण्यात आली. त्याचबरोबर अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी-परंपरा आणि विविध सामाजिक समस्यांना मिळणारे खतपाणी थांबवून समाजात विवेकी विचार रुजविण्यासाठी महिलांचे प्रबोधन आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. या पार्श्वभूमीवर तालुका कार्यकारिणीने महिला मेळावा घेण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी पहिला मान म्हसदी गावाला देण्यात आला आहे. मेळाव्यात महिलांना सामाजिक प्रश्नांबाबत जागरूक करण्यासोबतच त्यांच्या सहभागातून समाजपरिवर्तनाला चालना देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. पूर्वतयारीसाठी समिती बैठकीत मेळाव्याचे स्थळ, तारीख, वेळ तसेच आर्थिक नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली. मेळावा यशस्वी करण्यासाठी गावातील ज्येष्ठ नागरिक आणि युवकांची समिती गठित करण्यात आली. उपसरपंच चंद्रकांत देवरे यांनी मेळाव्याच्या आयोजनासाठी होणारा आर्थिक खर्च करण्याची तयारी दर्शविली. गंगाराम देवरे, नामदेव देसले, राजेंद्र देवरे, यशवंतराव देवरे, ॲड. नरेंद्र मराठे, संजीवनी गांगुर्डे, चंद्रकांत देवरे, विलास देसले आदींनी चर्चेत सहभाग घेतला. विलास देसले यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Building Collapse : दिल्लीत पाच मजली इमारत कोसळली, ५० विद्यार्थी ढिगाऱ्याखाली, बचावकार्य सुरु...

Dream Astrology: रात्री झोपेत साप चावणे, पडणे किंवा दात पडणे... अशी स्वप्नं पडतायत? स्वप्नशास्त्रानुसार जाणून घ्या यामागचे नेमके संकेत काय

प्रत्यक्षात अंतर ७४ किमी, फलकावर १३६; NHAIचा अजब कारभार, चुकीच्या आकड्यांनी प्रवाशांचा गोंधळ

Marathi News Live Updates : माजलगावच्या कॅनॉलमध्ये अज्ञात मृतदेह पाईपलाइनला अडकला

Pune Ganeshotsav DJ Ban : पुण्यात डीजेवर बंदी येणार? गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाद आणखी चिघळला; पोलिस उपायुक्तांनी केला खुलासा

SCROLL FOR NEXT