नाशिक

साक्षरता दिनानिमित्त देवरे विद्यालयात जनजागृती रॅली

CD
MSI26B09544 विखरण : आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त देवरे विद्यालयात रॅलीद्वारे जनप्रबोधन करताना विद्यार्थी व शिक्षक. --------------------- साक्षरता दिनानिमित्त देवरे विद्यालयात रॅली म्हसदी, ता. १४ : आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त येथील श्री. धंगाई विधायक कार्य मंडळाच्या विखरण (ता. नंदुरबार) येथील श्री.आप्पासो. आत्माराम धवळू देवरे माध्यमिक विद्यालयात साक्षरता रॅली काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी रॅलीद्वारे गावातील नागरिकांमध्ये शिक्षण, साक्षरतेचे महत्त्व पटवून देत जनप्रबोधन केले. विद्यार्थ्यांनी ‘शिक्षण हेच प्रगतीचे साधन’, ‘साक्षर व्हा, सक्षम व्हा’, ‘एकही व्यक्ती निरक्षर राहू नये’, ‘मुलगा- मुलगी शिकवा, समाज पुढे न्या’ अशा आशयाच्या घोषणांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी शिक्षणाचे महत्त्व, साक्षरतेची गरज आणि शिक्षणामुळे होणारा सामाजिक, आर्थिक विकास याबाबत जागरूक केले. रॅलीदरम्यान मुख्याध्यापक डी. डी. साळुंके यांनी आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनाचे महत्त्व अधोरेखित करत ‘साक्षर भारत, समृद्ध भारत’ असा संदेश देत प्रत्येक कुटुंबाने शिक्षणाला प्राधान्य द्यावे, तसेच असाक्षर व्यक्तींना साक्षर होण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन केले. रॅलीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी साक्षरतेचा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याचा प्रभावी प्रयत्न केला. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे पालक, ग्रामस्थ आणि उपस्थित नागरिकांनी कौतुक केले. उपशिक्षक डी. बी. भारती, एम. डी. नेरकर, आर. आर. बागूल, एम. एस. मराठे, ए. एस. बेडसे, एस. एच. गायकवाड, जे. एस. पाटील, डी. बी. पाटील, एस. जी. पाटील, एच. एम. खैरनार यांनी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPO Alert: NSE सह 5 IPO येणार! कोणता IPO देऊ शकतो सर्वाधिक Listing Gain? NSE IPO चा GMP किती?

सारखेनंतर आता ताटातली पोळीही महाग; एका महिन्यात गव्हाच्या दरात तब्बल २०० रुपयांची वाढ

Ganesh Chaturthi 2026: आपण गणपती बाप्पा म्हटलं की ‘मोरया’ का म्हणतो? या जयघोषामागे आहे एका गणेशभक्ताची कहाणी

Marathi News Live Updates : तलावातून निघते गणरायाची पालखी; रायगडच्या साले गावातील अनोखी परंपरा

Ganesh Chaturthi 2026: बाप्पाच्या चरणांशी उंदीर का असतो? उंदीर मामा कसा बनला गणपती बाप्पाचे वाहन? जाणून घ्या रंजक कथा!

SCROLL FOR NEXT