नाशिक

सी.गो.पाटील महाविद्यालयात ओझोन दिनानिमित्त व्याख्यान

CD
MSI26B09581 साक्री : सी. गो. पाटील महाविद्यालयात ओझोन दिनाच्या उद्‌घाटनप्रसंगी उपस्थित डॉ. अजय नांद्रे व प्राध्यापक. ---------------- ओझोन थराचे संरक्षण न केल्यास समस्या प्रा. डॉ. अजय नांद्रे यांचे प्रतिपादन सकाळ वृत्तसेवा म्हसदी, ता. २१ : मानवाच्या अतिरेकी, अविवेकी वर्तणुकीमुळे ओझोन थराला क्षती पोहोचत आहे. वेळीच ओझोन थराचे संरक्षण व संवर्धन केले नाही तर संपूर्ण मानव जातींना अनेकविध समस्यांना तोंड द्यावे लागेल, अशी भीती निसर्ग मित्र बहुउद्देशीय सेवा संस्थेचे अध्यक्ष, साक्री येथील विमलबाई उत्तमराव पाटील महाविद्यालयातील भूगोल विभागप्रमुख प्रा. डॉ. अजय नांद्रे यांनी व्यक्त केली. साक्रीत विद्या विकास मंडळाच्या सीताराम गोविंद पाटील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात भूगोल विभागातर्फे ओझोन दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. भूगोल विभागप्रमुख प्रा डॉ. एस. आर. गोवर्धने अध्यक्षस्थानी होते. पर्यवेक्षक प्रा. एस. टी. सूर्यवंशी, प्रा. कमलेश सूर्यवंशी, प्रा. भटू पाटील व प्रा. समवेल वसावे उपस्थित होते. प्रा. डॉ. एस. आर. गोवर्धने यांनी ओझोनच्या संरक्षणामुळे ग्लोबल वार्मिंगला आळा, सजीव सृष्टीचे रक्षण, अन्नसाखळीचे संतुलन, सहकार्याची भावना विकसित होते व पर्यायाने सखल वसुंधरेचे संतुलन राखले जाऊन जागतिक विकास होत असल्याचे मत व्यक्त केले. प्रा.कमलेश सूर्यवंशी यांनी ओझोन दिवसाचे महत्व विषद केले. प्रा. भटू पाटील यांनी सूत्रसंचालन केले. विद्यार्थी चेतन मोहिते यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Apple Layoffs: दोन महिन्यांत दुसऱ्यांदा कपात; Fitness+ मधील ‘या’ टीमवरही आता गदा

Asian Games, Cricket Live Streaming: सलग दुसऱ्यांदा गोल्ड मेडल जिंकणार टीम इंडिया? श्रीलंकेविरुद्ध रंगणार फायनल; कुठे पाहाणार?

वृद्धाश्रमात ८० वर्षीय वडिलांचा मृत्यू, मुलगा म्हणाला, अंत्यसंस्काराला वेळ नाही; छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक घटना

Marathi News Live Updates: पुण्यात गहाळ झालेली रोकड पोलिसांनी दोन दिवसांत शोधली

जस्टिस यशवंत वर्मा प्रकरणात 'एफआयआर'ची मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली; कोर्टाने नेमकं काय म्हटलं?

SCROLL FOR NEXT