MSI26B09597
विखरण : उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी विद्यार्थी व शिक्षक.
---------------
विखरण विद्यालयाचे
शिष्यवृत्ती परीक्षेत यश
म्हसदी, ता. २० : उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत येथील श्री. धंगाई विधायक कार्य मंडळाच्या विखरण (ता.नंदुरबार) येथील श्री.आप्पासाो.आत्माराम धवळू देवरे माध्यमिक विद्यालयातील २० विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यांपैकी २९ विद्यार्थी पात्र झाले असून, त्यातून दहा विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान पटकावत शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत.
त्यात यशराज पाटील २५० गुण ग्रामीण सर्वसाधारण (J- ९/१०३), मानसी पाटील २४८ गुण ग्रामीण सर्वसाधारण (J- २४/१०३), सौरभ पाटील २४६ गुण ग्रामीण सर्वसाधारण (J- ३०/१०३), हर्षदा पाटील २४६ गुण ग्रामीण सर्वसाधारण (J- ३२/१०३), विराज ठाकरे २४६ गुण ग्रामीण सर्वसाधारण (J- ३५/१०३), लक्षद्विप पाटील २४४ गुण ग्रामीण सर्वसाधारण (J- ५३/१०३), प्रणिता मराठे २४४ गुण ग्रामीण सर्वसाधारण (J- ५४/१०३), ललिता पाटील २४४ गुण ग्रामीण सर्वसाधारण (J- ६५/१०३), अक्षरा पाटील २४२ गुण ग्रामीण सर्वसाधारण (J- ८९/१०३), वैभवी भिल २४२ गुण ग्रामीण सर्वसाधारण (J- ९५/१०३), गुणांसह शिष्यवृत्ती पात्र ठरले. गुणवत्ता यादीत स्थान मिळविल्याबद्दल विद्यार्थ्यांना सलग तीन वर्ष सात हजार ५०० रुपये प्रतिवर्ष शिष्यवृत्ती प्राप्त होणार आहे.
संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र देवरे, शालेय समितीच्या अध्यक्षा शैलजा देवरे, सचिव नरेंद्र देवरे, कोशाध्यक्ष सतीश देवरे व पालकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक डी. डी. साळुंके, एम. डी. नेरकर, सी. व्ही. नांद्रे, डॉ. आर. आर. बागूल, एम. एस. मराठे, डी. बी. भारती, वाय. डी. बागूल, एस. एच. गायकवाड, ए. एस. बेडसे, व्ही. बी. अहिरे आदींचे मार्गदर्शन लाभले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.