नाशिक

शेतकऱ्यांना मक्याच्या पेमेंटची प्रतिक्षा

CD
सकाळ विशेष मेन फिचर मक्याचे पेमेंट थकल्याने खरीपावर परिणाम ------------------------------------ जिल्ह्यातील ३५०० शेतकऱ्यांचे ५४ कोटी थकले प्रशांत बैरागी : सकाळ वृत्तसेवा नामपूर, ता. १४ : गेल्या काही महिन्यांपासून कांद्यासह शेतमालाचे भाव कमालीचे घसरले आहेत. कर्जाचा बोजा दिवसेंदिवस वाढत असताना तीन महिन्यांपासून किमान आधारभूत दर योजनेंतर्गत विकलेल्या मक्याचे जिल्ह्यातील सुमारे साडेतीन हजार शेतकऱ्यांचे सुमारे ५४ कोटीचे पेमेंट शासनाकडे अडकल्याने मान्सूनपूर्व शेतीच्या कामांना खोळंबा निर्माण झाला आहे. हमी भावाने मका खरेदीसाठी मोठा गाजावाजा करुन जिल्ह्यात अनेक ठिकाणी केंद्र सुरू करण्यात आले. मात्र सरकारी अनास्थेमुळे मका खरेदी योजनेचा बोजवारा उडाला आहे. जिल्ह्यातील सात हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी शासकीय खरेदी योजनेंतर्गत मका विकला. विक्रीनंतर किमान १५ दिवसांनंतर हमीभावाप्रमाणे पैसे पदरी पडतील, अशी आशा लावून शेतकरी बसले होते. मात्र खरेदी सुरू होऊन सुमारे तीन महिने उलटूनही जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मका खरेदीपोटी पैसे मिळालेले नाहीत. अत्यंत किचकट असणाऱ्या ऑनलाईन मका खरेदी योजनेत अनेक अटी-शर्ती असल्याने शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागला. भांडवल नसल्याने एकीकडे बँका पीककर्ज वेळेवर देत नसल्याने उसनवारी, सावकारी कर्ज घेऊन काहींनी पैसा उभा केला. केंद्रावर मका खरेदी पूर्ण न झाल्याने अनेकवेळा खरेदीचे उद्दिष्ट्य वाढवण्यात आले. दुसरीकडे ज्यांनी मका विकला अशा शेतकऱ्यांना मका विकून आता पैसे कधी मिळतील याची वाट पाहावी लागत आहे. नाशिकच्या जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयाने पोर्टलवर नोंद झालेला मक्याच्या पेमेंट मागणीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविल्याचे सांगण्यात आले आहे. कोट शेतकऱ्यांनी दोन पैशांच्या अपेक्षेने केंद्रावर मका विकला. खरेदी सुरू होऊन दोन महिने होऊन गेले. अनेक शेतकरी आता देयकांच्या बाबतीत प्रतीक्षेत असून, सातत्याने विचारणा करतात. पैसे न मिळल्याने अनेकांचे फोन येतात. शासनाने तातडीने पैसे खात्यावर जमा करावेत. -जगदीश सावंत, सभापती नामपूर सहकारी सोसायटी @चौकट *लाभार्थी संख्या : ७ हजार ३६९ *मका खरेदी क्विंटल : ३ लाख ८४ हजार ५९६ क्विंटल *पेमेंट दिलेल्या शेतकरी संख्या : ३ हजार ८९४ *४ मार्च अखेर अदा केलेले पेमेंट रक्कम : ३७ कोटी ५७ लाख १४ हजार ८४०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : व्हीआयपी दौऱ्यातील ताफा आता निम्म्यावर; पुणे पोलिसांचा निर्णय

Pune Garbage Management : बालेवाडीत कचरा संकलनासाठी पीएमपी बस डेपोची ३ हजार चौ.फु. जागा; स्थायी समितीची मंजुरी

Vaibhav Sooryavanshi ला टीम इंडियात संधी मिळाली, LSG च्या संजीव गोएंका यांची पोस्ट व्हायरल! म्हणतात, देश आश्चर्याने पाहत आहे...

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात; पण रक्कम पाहून महिलांना बसला धक्का!

Pune DPC Meet: प्रशासकीय खर्च कपातीसाठी पुण्यात जिल्हा नियोजन समितीची बैठक ऑनलाइन; मोदींच्या आवाहनानुसार तातडीने अंमलबजावणी

SCROLL FOR NEXT