नाशिक

राज्यात पहिल्यांदा एकल महिला दिन

CD
मेन फिचर राज्यात पहिल्यांदा एकल महिला दिन ------------------------------- राज्यात एकल महिलांना सन्मान देण्याचे धोरण सकाळ वृत्तसेवा नामपूर, ता. २२ : संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलेला २३ जून हा ‘आंतरराष्ट्रीय विधवा दिन’ राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत आणि ग्रामपंचायतींमध्ये ‘एकल महिला दिवस’ राज्यात पहिल्यांदा साजरा होत आहे.गावातील किंवा शहरातील एकल महिलांना सन्मानाने या कार्यक्रमाला निमंत्रित करण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्रालयाचे निर्देश आहेत. आगामी काळात राज्यात ‘विधवा’ या शब्दाऐवजी ‘एकल महिला’ ही सन्मानजनक संज्ञा वापरण्यात यावी; तसेच, गाव अथवा शहरामध्ये एकल महिलांना रूढी-परंपरांच्या आधारावर अपमानास्पद वागणूक दिली जाणार नाही, याबाबत ग्रामसभा अथवा स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत ठराव मंजूर करण्यात यावा. तसेच, या कार्यक्रमानिमित्त राज्य शासनाच्या प्रस्तावित एकल महिला धोरणात कोणत्या बाबींचा समावेश असावा याविषयी महिलांची मते, सूचना आणि अपेक्षा जाणून घेऊन त्या शासनाकडे पाठवण्याचे निर्देश महिला, बालविकास मंत्रालयाने दिले आहेत. एकल महिलांच्या सामाजिक, आर्थिक आणि प्रशासकीय अडचणी जाणून घेऊन त्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करण्यासाठी; तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी स्थानिक प्रशासनाने पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा आहे. चौकट अशी होणार अंमलबजावणी... महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांनी केलेल्या कार्याची माहिती द्यावी, रोजगार, स्वयंरोजगार आणि उपजीविकेच्या संधींबाबत चर्चा करून, बचत गटात नसलेल्या महिलांना बचत गटांमध्ये समाविष्ट करण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत. शासकीय योजनांची माहिती आणि त्यांचा लाभ अधिक प्रभावीपणे एकल महिलांपर्यंत पोहोचण्यासह समाजात एकल महिलांना सन्मानपूर्वक व समानतेची वागणूक मिळावी यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL : साई सुदर्शनची माघार; निवड समितीला आठवला मुंबईचा शिलेदार, आता मज्जा येणार

Pune Crime: दूध भेसळप्रकरणी पोलिसांचा धडाका; आणखी १० आरोपी अटकेत, एकूण २४ जणांना बेड्या

Pune Crime: किरकोळ कारणावरून वाद अन् थेट हल्ला; मारहाणीत ५९ वर्षीय महिलेचा मृत्यू, कोलदऱ्यात किरकोळ वादाचा थरारक शेवट

'Yashasvi Jaiswal वर ४ सामन्यांच्या बंदीचे पत्र मॅच रेफरीने लिहून ठेवलं होतं...', अजिंक्य रहाणेचा 'त्या' वादाबद्दल खळबळजनक खुलासा

Godavari River: गंगापूरच्या अमळनेर वस्तीत हृदयद्रावक घटना; गोदावरीच्या पुराच्या पाण्यात बहीण-भावाचा बुडून मृत्यू

SCROLL FOR NEXT