नामपूरला पहिल्या पावसाची हजेरी
नामपूर : गेल्या अनेक दिवसांपासून चातकासारखी आतुरतेने वाट पाहणाऱ्या नामपूरकरांची प्रतीक्षा अखेर संपली. शहरात दुपारच्या सुमारास दोनवेळा मान्सूनच्या पावसाने हजेरी लावल्याने असह्य उकाड्यापासून सुटका झाली आहे.
दुपारनंतर पावसाच्या सरींनी संपूर्ण परिसराला चिंब भिजवून टाकले. सोमवार आठवडे बाजाराचा दिवस असल्याने भाजीपाला विक्रेते, अनेक व्यावसायिक, नागरिकांचे अचानक आलेल्या पावसामुळे हाल झाले. लग्नाची तिथी असल्याने शहरातील मंगल कार्यालयात अडकून पडलेल्या वऱ्हाडी मंडळीना पावसामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागला. ऐन शाळा सुटण्याच्या वेळी पावसाला सुरुवात झाल्याने पहिल्या पावसात भिजून घर गाठण्याचा आनंद चिमुकल्यांनी घेतला.
नामपूर : बसस्थानक परिसरात साचलेले पाणी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.