नाशिक

बहिणींना फुकट मिळणार जमीन

CD
लोगो : ‘राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजना’ एक रुपयात जमीन; महिलांच्या सक्षमीकरणाला नवे बळ बचत गटांना भाडेपट्ट्यावर शासकीय जमिनी, पशुपालन व रोजगाराला चालना सकाळ वृत्तसेवा नामपूर, ता. २४ : ग्रामीण भागातील महिलांचे आर्थिक सक्षमीकरण, पशुपालनाला प्रोत्साहन आणि शासकीय जमिनींवरील अतिक्रमणांना आळा घालण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. महसूल विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजनें’तर्गत पात्र महिला बचत गटांना शासकीय जमिनी केवळ एक रुपया नाममात्र शुल्कावर भाडेपट्ट्याने उपलब्ध करून दिल्या जातील. शासनाच्या या निर्णयाचे ग्रामीण भागातील महिलांनी स्वागत केले आहे. राज्यातील पडीक शासकीय जमिनींचा उत्पादक वापर व्हावा आणि महिलांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध व्हावे, यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे. नोंदणीकृत महिला बचतगट, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवांचे बचतगट, तसेच उमेद आणि माविम अंतर्गत कार्यरत ग्रामसंघांना या योजनेचा लाभ मिळेल. योजनेंतर्गत सातबारा उताऱ्यावर ‘महाराष्ट्र शासन’, ‘शासकीय मुलकीपड’ किंवा ‘आकारीपड’ अशी नोंद असलेल्या जमिनी, प्रकल्पासाठी संपादित होऊन सध्या पडून असलेल्या जमिनी, शेती महामंडळाच्या पडीक जमिनी, तसेच ग्रामसभेच्या परवानगीने गायरान जमिनी भाडेतत्त्वावर देण्यात येणार आहेत. मात्र, पुनर्वसनासाठी राखीव जमिनी, गाळपेर क्षेत्र तसेच विशेष प्राधिकरणाच्या ताब्यातील जमिनी या योजनेतून वगळण्यात आल्या. योजनेच्या अंमलबजावणीसाठी तहसीलदारांना गावनिहाय शासकीय जमिनींची माहिती अद्ययावत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्हा व तालुका स्तरावरील समित्यांमार्फत पात्र अर्जांची छाननी करून जमीन वाटपाची प्रक्रिया राबविली जाईल. चौकट पात्रतेच्या अटी - गट ‘उमेद’ अभियानांतर्गत नोंदणीकृत असावा - नोंदणीला किमान तीन वर्षे पूर्ण झालेली असावीत - बँक खाते किमान एक वर्ष सक्रिय असावे - वार्षिक उलाढाल किमान ५० हजार रुपये असावी - दहा सदस्यांच्या गटाला एक हेक्टर - वीस सदस्यांच्या गटाला दोन हेक्टर - ग्रामसंघाला पाच हेक्टरपर्यंत जमीन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lohagad Murder Case: ''प्रतिष्ठेसाठी सियाने केतनला ठार मारण्याचा प्लॅन केला'', पोलिस चौकशीत चेतनचा धक्कादायक दावा

Rishabh Pant: 'भाई, कन्फर्म! मी परत येतोय...' DC सोबतच्या ट्रेडनंतर रिषभचा फोन अक्षर पटेलने आधी उचलाच नव्हता अन् मग...

Government Recruitment: मोठी बातमी! आरोग्य विभागात लवकरच पदभरती; पदनिर्मितीचा जीआर निघाला, राज्यात एवढ्या जागा रिक्त

Pune City Yellow Alert : पुणे शहराला ‘यलो’ तर घाटमाथ्याला ‘ऑरेंज’ अलर्ट; पुढील तीन दिवसात पावसाचा जोर वाढणार

Latest Marathi News Live Update: नसरापूर अत्याचार प्रकरणाचा उद्या निकाल

SCROLL FOR NEXT