नाशिक

आदिवासी समाज मेळावा

CD
आदिवासी समाज विकासापासून वंचित ------------------------------- लकी जाधव ः आदिवासी समाज मेळावा               सकाळ वृत्तसेवा नामपूर ता. २४ : बागलाण तालुक्यातील आदिवासी बांधव अनेक वर्षांपासून मूलभूत सुविधा पासून वंचित असल्याने समाजाला मुख्य प्रवाहात  आणण्यासाठी  सत्ताधाऱ्यांवर दबावगट निर्माण करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन रॉबिनहूड तंट्यामामा भिल संघर्ष समितीचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष लकी जाधव यांनी केले. येथील भाग्यविधाता मंगल कार्यालयात बुधवारी (ता. २४ ) आदिवासी समाजाच्या जनजागृती मेळाव्यात ते बोलत होते. व्यासपीठावर  नामपूर बाजार समितीचे माजी संचालक आंनदा मोरे,  दीपक मोरे, सुनिल गायकवाड, सुहास गावित, पवन  सोनवणे, सुनील गायकवाड, निर्मला वाघ, दिलीप बर्डे, आदी मान्यवर उपस्थित होते. सुरुवातीला भगवान एकलव्य, बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. जाधव म्हणाले की, देशाच्या इतिहासात आदिवासी समाजाचे मोठे योगदान आहे. इंग्रजाना जेरीस आणणाऱ्या आदिवासी समाजाची आजही फारशी प्रगती झालेली नाही. समाजाला मुख्य प्रवाजात येण्यासाठी  समाजातील मुलांनी शिकले पाहिजे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे म्हणाले की,  समाजाने व्यसनाधिनता, मोबाईलचा अतिरेक, बालविवाह टाळावा. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील, याकामी नागरिकांनी सहकार्य करावे. तालुक्यातील पदाधिकारी प्रवीण पवार, साहेबराव अहिरे, अनिल सोनवणे, अनिल पवार, वैभव मोरे, दिपक गायकवाड, किशोर सोनवणे, संजय दळवी, गोविंद ठाकरे, प्रदीप मोरे, नंदू शिंदे आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन शांताराम गायकवाड यांनी केले. प्रवीण पवार यांनी आभार मानले @चौकट संघर्ष समितीच्या मागण्या *आदिवासी मुलीचे बिगर आदिवासी सोबतचे विवाह रोखणे. *समाजाला संघटित करून मुख्य प्रवाहात आणणे *बोगस आदिवासी हटाव मोहीम राबवणे *पेसा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणे *धनगर समाजाचा आदिवासी प्रवर्गात समावेश करू नये. नामपूर : येथील आदिवासी समाजाच्या मेळाव्यात बोलताना लकी जाधव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL 1st Test: गौतम गंभीरने खेळपट्टीची पाहणी केली, पाठ वळताच क्युरेटरने 'खेळी' खेळली; कॅप्टन, कोचने एकवटले... माईंड गेम

शूटिंगदरम्यान ज्युनिअर एनटीआरला झालेली गंभीर दुखापत; खांद्यावर झाली शस्त्रक्रिया, आता 2 ते 3 महिन्यांचा घेणार ब्रेक

IND vs SL: शुभमन गिल-रिषभ पंत श्रीलंकेत धुमाकूळ घालणार? WTC मध्ये आजपर्यंत कोणालाही न जमलेला पराक्रम करण्याची संधी

Latest Marathi News Live Update : तुम्ही मला अस्पृश्यासारखी वागणूक देता, 'शुद्धीकरण' करता आणि माझा अपमान करता."- खर्गे राज्यसभेत संतापले

‘Gift a Life After Life’! अवयवदानासाठी ५०० विद्यार्थ्यांचा पुढाकार; ‘Tree Of Life’मधून दिला जीवनाचा संदेश

SCROLL FOR NEXT