नाशिक

मार्केटचे ८० लाखांचे गाळे

CD
दोन गाळ्यांच्या लिलावातून बाजार समितीला ८० लाखांचे उत्पन्न सकाळ वृत्तसेवा नामपूर, ता. १८ : येथील बाजार समितीच्या मालकीच्या मालेगाव रस्त्यालगत असणाऱ्या शॉपिंग सेंटरजवळ असणाऱ्या दोन गाळ्यांचा खुल्या पद्धतीने लिलाव झाला. यात प्रत्येकी गाळ्यासाठी ४० लाखांची सर्वोच्च बोली लागल्याने ८० लाखांचे विक्रमी उत्पन्न बाजार समितीला मिळाले आहे. एका गाळ्यासाठी चाळीस लाखांचा महसूल मिळवणारी नामपूर राज्यातील एकमेव बाजार समिती ठरली आहे. नामपूर बाजार समितीच्या वजन काट्याजवळ बाजार समितीच्या हद्दीत जागा असल्याने दोन गाळ्यांचे बांधकाम करण्यात आले होते. त्यानंतर सहकार आणि पणन विभागाच्या परवानगीनंतर सदर गाळ्यांच्या विक्रीसाठी लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली. एका गळ्यासाठी एक लाख रुपये अनामत रक्कम निश्चित करण्यात आली होती. लिलावात शहरातील सुमारे १२ पेक्षा अधिक व्यापाऱ्यांनी सहभाग घेतला. लिलावात ताराचंद मुनोत, त्यांच्या पत्नी वर्षा ताराचंद मुनोत यांनी प्रति गाळ्यासाठी सर्वोच्च ४० लाख रुपयांची बोली लावल्याने मुनोत दांपत्यामुळे तब्बल ८० लाख रुपयांचा महसूल बाजार समितीला मिळाला. यावेळी सभापती मनिषा पगार, उपसभापती किरण वाघ, सर्व संचालक मंडळ, सचिव संतोष गायकवाड, आदी उपस्थित होते. उद्योजक सचिन भामरे, भाऊसाहेब कापडणीस, सचिन अहिरराव, दीप्तेश मुथा, निलेश काळे, शाम बिरारी, चेतन पगार, अझर शेख, मोठाभाऊ कापडणीस, हर्षल कापडणीस, भूषण भामरे, रंजन कापडणीस आदींनी लिलावप्रकीयेत सहभाग घेतला. ----- नामपूरला व्यापारी महत्त्व असल्याने लिलावात गाळ्यांना सर्वोच्च बोली लागली. बाजार समितीच्या मालकीचे मालेगाव आणि नळकस रस्त्यालगत सुमारे १०५ गाळे असून गाळ्यांच्या उत्पन्नातून शेतकऱ्यांचे हित जोपासले जाते. सर्व संचालकांनी गाळ्यांच्या खुल्या लिलावाला अनुमती दर्शविल्यामुळे बाजार समितीचे हित जोपासले गेले. शेतकऱ्यांच्या हितासाठी बाजार समिती प्रशासन कटिबद्ध आहे. - मनिषा पगार, सभापती नामपूर बाजार समिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी ३ महिन्यांचं वेतन दिलं पूरग्रस्तांसाठी; मुख्यमंत्री सहाय्यता निधीत पाठवले पैसे

'चला हवा येऊ द्या'मध्ये तुकाराम मुंढेंचं पात्र साकारण्यास निलेश साबळेंचा नकार; कारण काय?

Eknath Shinde Dare Village : गावी आलो किंवा लंडनला गेलो तरी पोटदुखी, “ विरोधकांना कामातून उत्तर देईन”,एकनाथ शिंदेंनी दरेतून साधला निशाणा

Marathi News Live Updates : UPI व्यवहारांवर शुल्क, व्यापाऱ्यांकडून QR कोड हटवण्याची भूमिका

रोहित शर्माचा Mumbai Indians मधील 'सहकारी' Ajit Agarkar ची जागा घेणार; आता हिटमॅन २०२७ चा वर्ल्ड कप खेळणारच...

SCROLL FOR NEXT